‘इसिस’चा संशयित अतिरेकी मुंबई विमानतळावर अटकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 6, 2017 05:45 AM2017-11-06T05:45:58+5:302017-11-06T05:47:38+5:30

‘इसिस’ या दहशतवादी संघटनेच्या संशयित अतिरेक्यास उत्तर प्रदेशच्या दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) शनिवारी रात्री स्थानिक पोलिसांच्या मदतीने मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर अटक केली.

Suspected suspect in Mumbai airport | ‘इसिस’चा संशयित अतिरेकी मुंबई विमानतळावर अटकेत

‘इसिस’चा संशयित अतिरेकी मुंबई विमानतळावर अटकेत

Next

मुंबई : ‘इसिस’ या दहशतवादी संघटनेच्या संशयित अतिरेक्यास उत्तर प्रदेशच्या दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) शनिवारी रात्री स्थानिक पोलिसांच्या मदतीने मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर अटक केली. ट्रान्झिस्ट रिमांडवर त्याला लखनऊ येथे नेण्यात आले आहे.
अबू जैद अल्लाउद्दीन शेख (४२) असे त्याचे नाव असून सौदी अरेबियाहून तो परतल्यावर त्याला अटक करण्यात आली. अबू जैदने देशातील महत्त्वाच्या ठिकाणी घातपाती हल्ल्याचा कट रचल्याचा संशय आहे. उत्तर प्रदेश एटीएसने एप्रिल महिन्यात ‘इसिस’च्या चौघा संशयित सदस्यांना अटक केली होती. त्यांच्याकडून या संघटनेच्या हालचालींची माहिती घेत असताना अबू जैद याचे नाव पुढे आले.

मूळचा आझमगडचा
अबू जैद हा मूळचा आझमगडच्या पश्चिम मोहल्ला, गंभीरनगर येथील रहिवासी असून काही महिन्यांपासून तो सौदी अरेबियात होता. ‘इसिस’च्या तो संपर्कात होता. देशातील प्रमुख ठिकाणी घातपाती हल्ला करणे, संघटनेत युवकांना सहभागी करून घेणे, यासाठी त्यांना प्रवृत्त करण्याची त्याच्याकडे जबाबदारी होती. तो शनिवारी मुंबईत येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार उत्तर प्रदेश एटीएसने मुंबई विमानतळावर सापळा
रचला होता.

Web Title: Suspected suspect in Mumbai airport

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.