संडे की रात फुटबॉल के साथ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2018 02:36 AM2018-07-16T02:36:27+5:302018-07-16T02:36:55+5:30

मागील एक महिन्यापासून मुंबईत ‘फिफा वर्ल्डकप २०१८’ मॅचच्या चर्चा रेल्वे स्थानक, हॉटेल, कॉलेज, आॅफिसमध्ये रंगत होत्या.

Sunday night with football | संडे की रात फुटबॉल के साथ

संडे की रात फुटबॉल के साथ

googlenewsNext

- कुलदीप घायवट 
मुंबई : मागील एक महिन्यापासून मुंबईत ‘फिफा वर्ल्डकप २०१८’ मॅचच्या चर्चा रेल्वे स्थानक, हॉटेल, कॉलेज, आॅफिसमध्ये रंगत होत्या. या चषकाची रविवारी ‘ग्रँड फायनल २०१८’ होती. परिणामी मुंबईतील क्लब, जिमखाने, मोठ्या इमारतींमध्ये स्क्रीनिंग, प्रोजेक्टर लावून फुटबॉलची मॅच बघत असल्याचे चित्र होते. क्रोएशिया आणि फ्रान्स यांची झुंज पाहण्यात फुटबॉलप्रेमी उत्साहित होते.
फुटबॉल सुरू होण्यापूर्वी सर्व रोनाल्डो, मेस्सी आणि नेमार यांची नावे घेऊनच मॅच बघत होते. मात्र यंदा त्यांच्या संघाला बाहेर पडावे लागले. त्यामुळेच फुटबॉलप्रेमींचा हिरमोड झाला. पण जशीजशी ग्रँड फायनल जवळ आली तसे फुटबॉलप्रेमी क्रोएशियाचे नेतृत्व करणारा लुका मॉडरिच आणि फ्रान्सचे नेतृत्व करणारा ह्युगो एललॉरिस यांचे चाहते झाले. अंतिम सामना रविवारी असल्याने मुंबईतील फुटबॉलप्रेमी हातात पॉपकॉर्न, टीमच्या जर्सी, झेंडे घेऊन जल्लोष करत होते. दरम्यान, दादर येथील नायगाव बीडीडी चाळ क्रमांक ६ ए मध्ये कुशल स्नेह मंडळ यांच्यावतीने दोन चाळींच्या मधोमध ८ बाय ८ चा पदडा लावून मॅचची मज्जा लुटण्यात आली.
गुगल डूडल
दर चार वर्षांनी ‘फिफा वर्ल्डकप’ मॅच होते. यंदा २०१८ साली वर्ल्डकप असल्याने गुगलवर आकर्षक डूडल ठेवण्यात आले. गुगलने डूडलवर लहान मुले इनडोअर आणि आउट डोअर फुटबॉल खेळताना दिसत आहेत. तिसऱ्या फोटोत फुटबॉलच्या चाहत्यांना दाखवण्यात आले आहे.
सोशल मीडियावरही क्रेझ
फुटबॉलची क्रेझ सोशल मीडियावरही दिसून येत आहे. सोशल मीडियावर #वर्ल्डकप फायनल २०१८, #वर्ल्डकप, #क्रोएशिया विरुद्ध फ्रान्स हे हॅश टॅग वापरले जात आहेत. कोणत्याही वस्तूला पाय मारण्याची संस्कृती नसल्याने आपला देश फुटबॉलमध्ये पुढे गेला नसल्याचेही मेसेज व्हायरल होत आहेत. रोनाल्डो आणि मेस्सीचे चाहते एकमेकांवर टीका करताना दिसून येत आहेत. मात्र लुका मॉडरिच आणि ह्युगो एललॉरिसचा चाहतावर्ग वाढला असल्याचे दिसून येते.

Web Title: Sunday night with football

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.