मुंबईत पावसाचे जोरदार पुनरागमन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2018 06:18 AM2018-06-24T06:18:24+5:302018-06-24T06:18:42+5:30

चार दिवसांपासून दडी मारलेल्या पावसाने शुक्रवार रात्रीपासून मुंबईत जोरदार पुनरागमन केले. पावसाच्या दमदार सरींमुळे शहरासह उपनगरातील सखल भागांत पाणी साचले.

Strong retreat in Mumbai | मुंबईत पावसाचे जोरदार पुनरागमन

मुंबईत पावसाचे जोरदार पुनरागमन

Next

मुंबई : चार दिवसांपासून दडी मारलेल्या पावसाने शुक्रवार रात्रीपासून मुंबईत जोरदार पुनरागमन केले. पावसाच्या दमदार सरींमुळे शहरासह उपनगरातील सखल भागांत पाणी साचले. मॅनहोलवर झाकण नसल्याने कुर्ला येथे एकाचा बुडून मृत्यू झाला. येत्या २४ तासांत कोकणात मुसळधार पावसाचा; तर राज्याच्या विविध भागांत दोन आठवड्यांत मान्सून सक्रीय होईल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.
मुंबई शहर आणि उपनगरांत शुक्रवारी रात्रीपासून पाऊस सुरू झाला. परळ, दादर, माहीम, वांद्रे, अंधेरी, मालाड, कांदिवली आणि बोरीवलीत शनिवारी दिवसभर जोरदार पाऊस झाला. कुलाबा येथे शनिवारी ८२.०६ मिमी; तर सांताक्रूझ येथे ९.७ मिमी पावसाची नोंद करण्यात आली.
ठाणे, पालघरमध्येही हजेरी
ठाणे, नवी मुंबई, वसई-विरार आणि पालघरमध्येही शुक्रवारी रात्रीपासून पावसाने हजेरी लावली. संततधार पावसामुळे वसईच्या समतानगर, साईनगर, ओमनगर या भागात रस्त्यांवर; तर नालासोपारा आणि विरारमध्येही काही भागांत पाणी साचले. पालघरच्या ग्रामीण भागात पावसाने हजेरी लावल्याने बळीराजा सुखावला. रायगड जिल्ह्यात अलिबाग, मुरूड, श्रीवर्धन परिसरात पाऊस सुरू आहे.
मॅनहोलमध्ये पडून तरुणाचा मृत्यू
कुर्ला सिग्नलजवळ असलेल्या प्रगती सोसायटीसमोरील मॅनहोलचे झाकण गायब झाल्याने आत पडून दिनेश जठोलिया (वय २४) यांचा मृत्यू झाला. शुक्रवारी रात्री अकराच्या सुमारास ही घटना घडली. गेल्यावर्षी मॅनहोलचं झाकण काढल्याने डॉ. दीपक अमरापूरकर यांचा मृत्यू झाला होता. यावर्षी मॅनहोलवर जाळ््या बसवण्याचे काम पालिकेने सुरू केले आहे. तरीही ही घटना घडली. दुसऱ्या घटनेत शनिवारी सकाळी शिवडी येथे तुलसीदास पतरा (वय २७) हा समुद्राच्या पाण्यात बुडाला. पण अग्निशमन दलाच्या जवानांनी वेळीच त्याला वाचवले. सध्या जे जे रूग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू असून त्याची प्रकृती स्थिर आहे.
भांडुपला दरड कोसळली
भांडुपच्या खिंडीपाडा भागात साईनाथ मित्र मंडळ चाळीलगतच्या दरडीचा काही भाग शनिवारी रात्री कोसळला. या घटनेत कोणीही जखमी झाले नाही. अग्निशमन दलाच्या जवानांनी आणि महापालिका कर्मचाºयांनी या दरडीजवळ असलेल्या चाळीतील रहिवाशांना सुरक्षितस्थळी हलवले.
मुंबईत १७ ठिकाणी शॉर्टसर्किटच्या घटना घडल्या. मात्र कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती अग्निशमन दलाकडून देण्यात आली.

जळगावात दोन तर वर्ध्यात एकाचा मृत्यू
जळगावातील बोदवड तालुक्यात वीज पडून दोघांचा मृत्यू झाला. जितेंद्र सुभाष माळी (२५, रा. शेलवड) व शंकर प्रभाकर वाघ (२८, रा. सुरवाडे) अशी मृतांची नावे आहेत. वर्धा जिल्ह्यात मंगेश सुधाकर भेंडे (२५) हा युवक मृत्युमुखी पडला.

कोल्हापूर, सांगलीत दमदार सरी
कोकणात रत्नागिरी
जिल्ह्यात पावसाचा जोर कायम होता. कोल्हापूर, सांगली, सोलापूर
जिल्ह्यातही दमदार सरी बरसल्या. मराठवाड्याला पावसाने पुन्हा झोडपून काढले. नांदेड, उस्मानाबाद, बीड, जालना, हिंगोली जिल्ह्यात मुसळधार पाऊस झाला. हिंगोलीत एक मुलगी ओढ्यात वाहून गेली. तर परभणी जिल्ह्यात पाच गावांचा संपर्क तुटला.

ठाणे, नवी मुंबई, वसई-विरार व पालघरमध्येही जोरदार पाऊस झाला. मॅनहोलवर झाकण नसल्याने कुर्ला येथे एकाचा बुडून मृत्यू झाला. मुंबई-गोवा महामार्गाच्या रुंदीकरणामुळे कर्नाळा खिंडीत रस्ता खचल्याने वाहतूक मंदावली. एक्स्प्रेस-वेवर पुण्याकडे जाणाºया मार्गावर दरड कोसळल्याने एक लेन बंद होती.

Web Title: Strong retreat in Mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.