राज्य सरकारची पुढील महिन्यात महाभरती, ३६ हजार जागा भरणार

By ऑनलाइन लोकमत | Published: July 5, 2018 06:01 AM2018-07-05T06:01:02+5:302018-07-05T06:01:02+5:30

महाराष्ट्र सरकारने ज्या ७२ हजार जागांची भरती करण्याचे ठरविले आहे, त्यापैकी ३६ हजार जागा पुढील महिन्यात भरण्यात येणार असून, त्यासाठी या महिन्याच्या अखेरीस जाहिराती देण्यात येणार आहेत, असे सांगण्यात आले.

 The state government will fill a total of 36 thousand seats in Mahabharati next month | राज्य सरकारची पुढील महिन्यात महाभरती, ३६ हजार जागा भरणार

राज्य सरकारची पुढील महिन्यात महाभरती, ३६ हजार जागा भरणार

googlenewsNext

नागपूर/ मुंबई : महाराष्ट्र सरकारने ज्या ७२ हजार जागांची भरती करण्याचे ठरविले आहे, त्यापैकी ३६ हजार जागा पुढील महिन्यात भरण्यात येणार असून, त्यासाठी या महिन्याच्या अखेरीस जाहिराती देण्यात येणार आहेत, असे सांगण्यात आले. या जागांसाठीच्या परीक्षा राज्य सरकारव्या महापोर्टलद्वारे एकाच दिवशी घेण्यात येतील, असे संकेतस्थळांचे वृत्त आहे.
कृषी, ग्रमाविकास, गृह, सार्वजनिक बांधकाम, आरोग्य, जलसंपदा, मृद् व जलसंधारण या विभागांची भरती पहिल्या टप्प्यात करण्यात यणार आहे. त्यासाठी प्रत्येक विभागाच्या प्रमुखांनी आपल्याकडील रिकाम्या जागांची माहिती १७ जुलैपर्यंत कळवायची आहे. त्यानंतर त्यासाठीच्या जाहिराती प्रसिद्ध होतील. महापोर्टलमार्फत घेण्यात येणार आहेत. सरकारने सर्व विभागांकडून खातेनिहाय रिक्त जागांची माहिती मागविण्यास सुरुवात केली आहे. या सर्व जागा ब व क गटातील आहेत.
पहिल्या टप्प्यात ग्रामविकास खात्यातील ११ हजार, गृह खात्यातील ७ हजार, आरोग्य खात्यातील १0 हजार, कृषी खात्यातील अडीच हजार पदे भरण्यात येणार आहे. तसेच पशुसंवर्धन खात्यातील १0४७, सार्वजनिक बांधकाम विभागातील ८३७ पदे आहेत. नगरविकास खात्यातील १६६४ पदे असून, अन्य खात्यांतील सुमारे १५00 जागा भरल्या जातील, असे समजते.
पुढील वर्षी लोकसभेच्या तसेच महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. त्याआधी केंद्र सरकार, महाराष्ट्र सरकार तसेच रेल्वेमधील भरती पूर्ण करण्याचे ठरले आहे. ज्या भाजपाशासित राज्यांत यावर्षी व पुढील वर्षी निवडणुका आहेत, तिथे नोकरभरती लगेच करण्याचे भाजपानेच ठरविले आहे. बेराजगार तरुणांना राज्य व केंद्राने सरकारी नोकऱ्या मिळवून दिल्या, असे भाजपाला दाखवून द्यायचे आहे. खासगीकंपन्यांत हव्या त्या प्रमाणात रोजगारांची निर्मिती होत नसल्याने सरकार बेरोजगारांसाठी प्रयत्नशील आहे, हे यातून दाखविणे शक्य होईल. शिवाय सर्व राज्ये व केंद्रातील सरकारी खात्यांत मिळून लाखो पदे रिकामीही आहेत.

उर्वरित जागा पुढील वर्षी
ही पदे महसूल विभागानुसार
तसेच जिल्हानिहाय भरण्यात
येणार आहेत. जिल्हाधिकाºयांमार्फत ही पदे भरली जातील, असे सांगण्यात आले. यंदा ३६ पदे भरल्यानंतर
आणखी तितक्याच जागा राज्य सरकार भरणार आहे. मात्र त्या जागा यंदा नव्हे, तर पुढील वर्षी भरण्यात येतील, असे सरकारी सूत्रांनी सांगितले.

Web Title:  The state government will fill a total of 36 thousand seats in Mahabharati next month

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.