फिल्मसिटीमध्ये लवकरच फिरणार ‘अत्याधुनिक’ रुग्णवाहिका

By ऑनलाइन लोकमत | Published: December 14, 2018 01:12 AM2018-12-14T01:12:47+5:302018-12-14T01:13:07+5:30

‘एफडब्ल्यूआयसीई’चा निर्णय; बड्या कलाकारांकडून मदतीचे आश्वासन

'State-of-the-art' ambulance will soon return to filmcity | फिल्मसिटीमध्ये लवकरच फिरणार ‘अत्याधुनिक’ रुग्णवाहिका

फिल्मसिटीमध्ये लवकरच फिरणार ‘अत्याधुनिक’ रुग्णवाहिका

Next

मुंबई : चित्रीकरणाच्या सेटवर बऱ्याचदा होणाºया लहानमोठ्या अपघातादरम्यान कामगारांना रुग्णालयात नेण्याची सोय नसते. ही बाब त्यांच्या जीवावर बेतू शकते. त्यामुळे लवकरच पाच अत्याधुनिक रुग्णवाहिका या सेटवर फिरणार असल्याची माहिती फेडरेशन आॅफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉइजच्या (एफडब्लूआयसीई) वरिष्ठ पदाधिकाºयांनी दिली. त्यामुळे कामगारांना मोठा दिलासा मिळणार आहे.

चित्रीकरण सुरू असताना सेट तुटणे, कामगार उंचावरून खाली पडणे, एखाद्या कठीण स्टंटदरम्यान स्टंटमन जखमी होणे, कधी आग लागणे, कामाच्या सततच्या दबावामुळे अस्वस्थपणा जाणवणे असे अनेक प्रकार फिल्मसिटीमध्ये घडतात. मात्र शूटिंग लवकर संपविण्याच्या प्रयत्नात संबंधित व्यक्तीकडे दुर्लक्ष केले जाते. ही बाब त्या व्यक्तीच्या जीवावरही बेतू शकते. फेडरेशनने चित्रपट दिग्दर्शक आणि प्रोडक्शन हाउसकडे बोलणी करून प्रत्येक सेटवर रुग्णवाहिकेची सोय असलीच पाहिजे अशी अट ठेवली आहे. मात्र तरीदेखील कामगाराला रुग्णालयात नेईपर्यंत त्याच्या जीवाचे बरेवाईट होण्याची भीती असते. ही बाब लक्षात घेत फिल्मसीटीमध्ये सर्व सोयी उपलब्ध असलेल्या पाच रुग्णवाहिका लवकरच सज्ज केल्या जाणार असल्याची माहिती पाच लाख मजुरांचा सहभाग असलेल्या एफडब्ल्यूआयसीइचे खजिनदार गंगेश्वर श्रीवास्तव उर्फ संजू यांनी लोकमतशी बोलताना दिली. फेडरेशनचे अध्यक्ष बी.के. तिवारी, सचिव अशोक दुबे आणि अन्य पदाधिकारीही यासाठी प्रयत्नशील असल्याचे श्रीवास्तव म्हणाले. या रुगवाहिकेमध्ये प्राथमिक उपचारासह आवश्यक औषधे, आॅक्सिजन, परिचारिकेसह एक डॉक्टरदेखील २४ तास उपलब्ध असेल. ही रुग्णवाहिका सेटवर चित्रीकरण सुरू असलेल्या ठिकाणी सतत फिरत राहील. फेडरेशनचे सदस्य असलेल्या कामगारांना त्याचा फायदा होईल, असेही त्यांनी नमूद केले.
यासाठी अमिताभ बच्चन, सलमान खान, शाहरूख खान यासारख्या बड्या अभिनेत्यांसह आधीच दोन रुग्णवाहिका दान करणाºया स्वस्तिक प्रोडक्शन हाउसचे राहुल तिवारी यांनीही मदतीचे आश्वासन दिल्याचे ते म्हणाले. फेडरेशनच्या या प्रयत्नाला अनेक चित्रपट दिग्दर्शक, कला दिग्दर्शक आणि कलाकारांचीही साथ लाभणार असून लवकरच या रुग्णवाहिका कामगारांच्या सेवेसाठी दाखल होणार आहेत.

Web Title: 'State-of-the-art' ambulance will soon return to filmcity

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Mumbaiमुंबई