ST buses are yours, please do not break them - Diwakar says | एसटी बसेस तुमच्याच आहेत, कृपया त्यांची तोडफोड करू नका- दिवाकर रावते

मुंबई : एसटी बसेस तुमच्याच आहेत, कृपया त्यांची मोडतोड करून सर्वसामान्य माणसांचे दळणवळणाचे हक्काचे साधन हिरावून घेऊ नका," असे भावनिक आवाहन परिवहन व खारभूमी विकासमंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांनी आंदोलनकर्त्यांना केले आहे.
भीमा-कोरेगाव संदर्भात होत असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर रावते यांनी आंदोलनकर्त्यांचा भावना व्यक्त करण्याचा हक्क आम्हाला जरी मान्य असला तरी त्या व्यक्त करीत असताना "सर्वसामान्यांच्या दळणवळणाचे हक्काचे साधन असलेल्या एसटीला वेळोवेळी आंदोलकांकडून 'लक्ष्य' केले जाते. त्यामुळे दररोज एसटीवर अवलंबून असणारी सर्वसामान्य जनतेला नाहक त्रास सहन करावा लागतो.
एसटीचे आर्थिक नुकसान तर होतेच, पण त्यापेक्षा प्रवाशांना होणारा त्रास अत्यंत विदारक असून कृपयास आंदोलकांनी जाळपोळ, दगडफेक रास्तारोको या माध्यमातून एसटीला लक्ष्य करून त्याची मोडतोड करू नये," असे भावनिक आवाहन केले आहे.