अमिताभ बच्चन यांचं 'ते' ट्विट अन् लगेचच आलेली श्रीदेवींच्या निधनाची बातमी... दुर्दैवी योगायोग

By ऑनलाइन लोकमत | Published: February 25, 2018 07:55 AM2018-02-25T07:55:05+5:302018-02-25T07:59:39+5:30

श्रीदेवी यांच्या अकाली निधनामुळे बॉलिवूड आणि चाहत्यांमध्ये शोककळा पसरली आहे.

sridevi-death-dubai-cardiac-arrest-amitabh-bachchan-tweet-khuda-gawah | अमिताभ बच्चन यांचं 'ते' ट्विट अन् लगेचच आलेली श्रीदेवींच्या निधनाची बातमी... दुर्दैवी योगायोग

अमिताभ बच्चन यांचं 'ते' ट्विट अन् लगेचच आलेली श्रीदेवींच्या निधनाची बातमी... दुर्दैवी योगायोग

Next

मुंबई : अभिनय, सौंदर्य आणि नृत्याविष्काराने चित्रपटप्रेमींच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या अभिनेत्री श्रीदेवी यांचे दुबईत ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्या 54 वर्षांच्या होत्या. कुटुंबीयांसह दुबईत एका लग्न समारंभासाठी गेल्या होत्या. त्यावेळी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या अकाली निधनामुळे बॉलिवूड आणि चाहत्यांमध्ये शोककळा पसरली आहे.

श्रीदेवी यांच्या निधनाची बातमी बाहेर येण्यापूर्वी अभिनेते अमिताभ बच्चन यांना एक ट्विट केलं होतं. ''न जाने क्यूँ , एक अजीब सी घबराहट हो रही है !!''  असे ट्विट करत त्यांनी आपल्या मनातील भिती व्यक्त केली होती. त्यांच्या या ट्विटनंतर काहीवेळात श्रीदेवी यांच्या निधनाची बातमी आली. त्यामुळं अमिताभ बच्चन यांना आधीच या दुख:द घटनेची मनात भीती वाटत होती का? किंवा अमिताभ बच्चन यांना श्रीदेवी यांच्या कुटुंबियांनीच   ह्रदयविकार झटका आला त्यावेळी कळवले होते का? अशीही शक्यताही असू शकते. 



 



 

अमिताभ बच्चन आणि श्रीदेवी यांनी आख‍री रास्‍ता और खुदा गवाह या सारखे दर्जेदार चित्रपटात एकत्र काम केलं आहे.   




 



 

श्रीदेवी यांच्या निधनाची बातमी समजताच बॉलिवूड आणि सोशल मीडियात शोक व्यक्त करण्यात येत आहे. रितेश देशमुख, सिद्धार्थ मल्होत्रा, जॉनी लिव्हर, प्रियांका चोप्रा, प्रिती झिंटा, नेहा धुपिया, झरिन खान यांच्यासह अनेक बॉलिवूडच्या कलाकारांनी श्रीदेवी यांना श्रद्धांजली वाहिली आहे.   प्रियांका चोप्राने शोक व्यक्त करताना ट्विटरवर लिहिले की, माझ्याकडे शब्द नाहीत. सर्वांकडून श्रीदेवींना श्रद्धांजली. आजचा काळा दिवस.   

 

Web Title: sridevi-death-dubai-cardiac-arrest-amitabh-bachchan-tweet-khuda-gawah

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.