गुगलच्या आकाशात मृत्यूनंतरही चमकली 'चांदनी'; एका दिवसात श्रीदेवींबाबत १ कोटी सर्च

By ऑनलाइन लोकमत | Published: February 26, 2018 12:19 PM2018-02-26T12:19:57+5:302018-02-26T12:20:02+5:30

काही जणांनी श्रीदेवी यांच्या अंत्यसंस्काराविषयी जाणून घेण्याचा प्रयत्न केला.

Sridevi become google queen after her death 1 crore search in single day | गुगलच्या आकाशात मृत्यूनंतरही चमकली 'चांदनी'; एका दिवसात श्रीदेवींबाबत १ कोटी सर्च

गुगलच्या आकाशात मृत्यूनंतरही चमकली 'चांदनी'; एका दिवसात श्रीदेवींबाबत १ कोटी सर्च

Next

मुंबई: अभिनेत्री श्रीदेवी यांचे शनिवारी दुबईत हदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. ही बातमी अनेकांसाठी धक्कादायक होती. हिंदी चित्रपटसृष्टीतील आपल्या प्रदीर्घ कारकीर्दीत श्रीदेवी यांनी अनेक सुपरहिट चित्रपट दिले. त्यानंतर श्रीदेवी तब्बल 16 वर्ष मोठ्या पडद्यापासून दूर होत्या. 2012 मध्ये गौरी शिंदे यांच्या इंग्लिश विंग्लिश चित्रपटाच्या माध्यमातून त्यांनी बॉलिवूडमध्ये पुनरागमन केले. त्यांचा हा चित्रपट चांगलाच गाजला. एकूणच या संपूर्ण काळात श्रीदेवी या ना त्या कारणाने कायम प्रकाशझोतात राहिल्या.

आश्चर्याची गोष्ट म्हणजे मृत्यूनंतरही श्रीदेवी यांची लोकप्रियता तसूभरही कमी झालेली नाही. याचा प्रत्यय काल इंटरनेटवर आला. श्रीदेवी यांच्या निधनाची बातमी आल्यानंतर रविवारी दिवसभरात अनेकजणांनी त्यांच्याबद्दलची माहिती इंटरनेटवर सर्च केली. 
काल दुपारी 12 वाजण्यापूर्वी 10 लाख लोकांनी श्रीदेवी यांच्या नावाने गुगल सर्च केले होते. दुपारी तीन वाजेपर्यंत हा आकडा 50 लाखांवर जाऊन पोहोचला. तर संध्याकाळी पाच वाजेपर्यंत हा आकडा एक कोटीच्यावर पोहोचला. 

लोकांनी श्रीदेवी यांच्या नावासोबतच कार्डिअॅक अरेस्ट आणि मोहित मारवाह याविषयीची माहितीही सर्च केली. तर काही जणांनी श्रीदेवी यांच्या अंत्यसंस्काराविषयी जाणून घेण्याचा प्रयत्न केला. याशिवाय, श्रीदेवी यांचे चित्रपट, गाणी, डॉटर्स ऑफ श्रीदेवी, श्रीदेवी लेटेस्ट न्यूज, अबाउट श्रीदेवी, श्रीदेवी अर्जुन कपूर हे सर्चेसही पाहायला मिळाले. 
 

Web Title: Sridevi become google queen after her death 1 crore search in single day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.