हिंदू व्यक्तीने धर्मांतर केले तरी वारसाहक्क अबाधित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 7, 2018 04:14 AM2018-03-07T04:14:07+5:302018-03-07T04:14:07+5:30

एखाद्या हिंदू व्यक्तीने धर्मांतर केले तरी वडिलांच्या मृत्यूनंतर त्यांच्या स्वअर्जित मालमत्तेत वाटा मिळविण्याचा तिचा वारसा हक्क संपुष्टात येत नाही. अशी धर्मांतरित व्यक्ती तिच्या इतर भावंडांप्रमाणे वडिलांच्या मिळकतीची कायदेशीर वारसदार ठरते, असा महत्त्वपूर्ण निकाल मुंबई उच्च न्यायालयाने मंगळवारी दिला.

 In spite of the conversion of a Hindu, hereditary succession prevailed | हिंदू व्यक्तीने धर्मांतर केले तरी वारसाहक्क अबाधित

हिंदू व्यक्तीने धर्मांतर केले तरी वारसाहक्क अबाधित

googlenewsNext

मुंबई  - एखाद्या हिंदू व्यक्तीने धर्मांतर केले तरी वडिलांच्या मृत्यूनंतर त्यांच्या स्वअर्जित मालमत्तेत वाटा मिळविण्याचा तिचा वारसा हक्क
संपुष्टात येत नाही. अशी धर्मांतरित व्यक्ती तिच्या इतर भावंडांप्रमाणे वडिलांच्या मिळकतीची कायदेशीर वारसदार ठरते, असा महत्त्वपूर्ण
निकाल मुंबई उच्च न्यायालयाने मंगळवारी दिला. मोगल लेन, माटुंगा (प.) येथे राहणारे बालचंद जयरामदास लालवंत यांनी केलेले अपील फेटाळताना न्या. मृदुला भाटकर यांनी हा निकाल दिला. बालचंद यांच्या एका बहिणीने (नाझनीन खालिद कुरेशी) सन १९७९ मध्ये धर्मांतर करून एका मुस्लिमाशी विवाह केला होता. बालचंद यांच्या वडिलांची एक राहते घर व एक दुकान अशी स्वअर्जित मालमत्ता होती. वडिलांच्या निधनानंतर बालचंद यांनी यापैकी दुकान विकले. त्यांनी राहता μलॅटही विकण्याच्या हालचाली सुरु
केल्या तेव्हा मुस्लिम झालेल्या बहिणीने त्यात वारसाहक्काने आपल्याला वाटा मिळावा यासाठी दिवाणी न्यायालयात दावा दाखल
केला. त्या दाव्यात बहिणीने केलेला अंतरिम अर्ज मंजूर करून दिवाणी न्यायालयाने बालचंद यांना μलॅट
विकण्यास अथवा त्यात कोणा त्रयस्थाचे हितसंबंध निर्माण करण्यास मनाई करणारा आदेश दिला. बालचंद यांनी या विरुद्ध उच्च
न्यायालयात अपील केले होते. १९५६ चा हिंदू वारसा हक्क कायदा बौद्ध, जैन
व शिखांसह फक्त हिंदूंनाच लागू होतो. त्यामुळे जन्माने हिंदू असलेली परंतु नंतर मुस्लिम झालेली व्यक्ती या कायद्यानुसार वडिलांच्या मालमत्तेत वारसाहक्क सांगू शकत नाही, असे त्यांचे मुख्य प्रतिपादन होते.

निकालातील महत्वाचे मुद्दे
♦हिंदू वारसा हक्क कायदा मृत्यूपत्र न करता मरण
पावणाºया हिंदू व्यक्तीच्या स्वअर्जित मालमत्तेची
त्याच्या वारसांमध्ये कशी वाटणी करावी
यासंबंधीचा आहे.
♦मरण पावणारी व्यक्ती हिंदू होती म्हणून तिच्या
मालमत्तेची वारसदारांमध्ये वाटणी तिला लागू
होणाºया कायद्याने करणे यासाठी हा कायदा
आहे.
♦वारसा हक्क हा जन्माने प्राप्त होणारा हक्क
आहे. त्यामुळे आयुष्यात पुढे धर्मांतर केले तरी
हिंदू व्यक्तीचे अपत्य म्हणून मिळालेला जन्मजात
हक्क संपुष्टात येत नाही.
♦या कायद्याच्या कलम २६ मध्ये धर्मांतर करणाºया वारसांच्या
अपत्यांना वारसाहक्क नाकारण्यात आला आहे. मात्र हा
नकारात्मक प्रतिबंध खुद्द धर्मांतर करणाºया वारसाला लागू
होत नाही. म्हणजेच हिंदू व्यक्तीच्या मुलाने किंवा मुलीने
धर्मांतर केले तरी तो मुलगा किंवा मुलगी त्याच्या पश्चात
मालमत्तेत वारसदार ठरतात. मात्र नातवंडे वारसदार ठरत नाहीत.
♦भारतीय राज्यघटनेने प्रत्येक नागरिकास त्याच्या पसंतीच्या
धर्माचे अनुसरण करण्याचे स्वातंत्र्य दिले आहे. धर्म जन्माने
ठरत असला तरी व्यक्ती त्या जन्मजात धर्माचा स्वेच्छेने त्याग
करून अन्य धर्म स्वीकारू शकते. आयुष्यात पुढे अन्य धर्म
स्वीकारला तरी त्यामुळे जन्मजात धर्मामुळे प्राप्त झालेल्या
हक्कांना बाधा येत नाही.

Web Title:  In spite of the conversion of a Hindu, hereditary succession prevailed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.