Spelling blunder near Thane Station | रेल्वे स्थानकावर पुन्हा मराठी भाषेची दैना 
रेल्वे स्थानकावर पुन्हा मराठी भाषेची दैना 

मुंबई : रेल्वे प्रशासनामध्ये मराठी भाषेबाबत असलेल्या सावत्र प्रेमावर पुन्हा एकदा जागरूक नागरिकांनी आठवण करून दिली आहे. मध्य रेल्वेत मराठी अधिकारी नसल्यामुळे भाषांतर app च्या मदतीने भाषांतर करून अक्षरामध्ये गोंधळ उडाल्याने नेटिझन्सने मध्य रेल्वेवर टीकेची झोड उठवली आहे. ठाणे स्थानकात जलद आणि मोफत वायफाय सेवा उपलब्ध आहे. याची माहिती प्रवाशांना देण्यासाठी ठाणे स्टेशनवर जलद , मोफत वायफाय मिलवा असे फलक लावण्यात आले आहे. फलकात 'मिळवा' या शब्दाऐवजी 'मिलवा' असे लिहिण्यात आले आहे. दरम्यान समाजमाध्यमावर हे फोटो सध्या चर्चेचा विषय बनत आहे. यापूर्वी पश्चिम रेल्वेने भाषांतर app चा वापर करून इंग्रजी भाषेतील सूचना चुकीच्या पद्धतीने मराठी भाषेत छापून त्याचे स्टिकर लावल्यामुळे पश्चिम रेल्वेला प्रवाशांच्या टीकेचा सामना करावा लागला होता.
 


Web Title: Spelling blunder near Thane Station
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.