अंधेरी स्थानकावर तिकीटाच्या रांगेत उभ्या महिलेच्या डोक्यावर कोसळला स्लॅब, रेल्वेकडून उपचारासाठी 500 रुपये

By ऑनलाइन लोकमत | Published: November 13, 2017 11:34 AM2017-11-13T11:34:02+5:302017-11-13T11:36:11+5:30

56 वर्षीय आशा मोरे अंधेरी रेल्वे स्थानकात तिकीटाच्या रांगेत उभ्या असताना हा स्लॅब कोसळला. या दुर्घटनेत आशा मोरे गंभीर जखमी झाल्या असून त्याला उपचारासाठी कूपर रुग्णालयात दाखल करण्यात आलं. 

Slab collapsed on the head of a woman in a queue on the Andheri station, Rs 500 for treatment | अंधेरी स्थानकावर तिकीटाच्या रांगेत उभ्या महिलेच्या डोक्यावर कोसळला स्लॅब, रेल्वेकडून उपचारासाठी 500 रुपये

अंधेरी स्थानकावर तिकीटाच्या रांगेत उभ्या महिलेच्या डोक्यावर कोसळला स्लॅब, रेल्वेकडून उपचारासाठी 500 रुपये

Next

मुंबई - अंधेरी रेल्वे स्थानकावर डोक्यावर स्लॅब कोसळल्याने एक महिला गंभीर जखमी झाल्याची घटना समोर आली आहे. आशा मोरे असं या महिलेचं नाव आहे. 56 वर्षीय आशा मोरे अंधेरी रेल्वे स्थानकात तिकीटाच्या रांगेत उभ्या असताना हा स्लॅब कोसळला. या दुर्घटनेत आशा मोरे गंभीर जखमी झाल्या असून त्याला उपचारासाठी कूपर रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. 

आशा मोरे तिकीट काढण्यासाठी रांगेत उभ्या असताना अचानक स्लॅब त्यांच्या डोक्यात कोसळला. स्लॅब कोसळल्याने आशा मोरे जागेवरच बेशुद्ध पडल्या होत्या. यानंतर त्यांना तात्काळ रेल्वेच्या अॅम्ब्युनलन्समधून कुपर रुग्णालयात दाखल करण्यात आलं. कुपर रुग्णालयात त्यांच्यावर उपचार करण्यात आले असून त्यांच्या डोक्याला 20 टाके पडले आहेत. 



 

महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्याच बेजबाबदार कारभारामुळे ही दुर्घटना घडली असताना रेल्वे मात्र याकडे गंभीरतेने पाहताना दिसत नाही. आशा मोरे इतक्या गंभीर जखमी झाल्या असताना रेल्वेने मात्र त्यांना उपचारासाठी फक्त 500 रुपयांची मदत देण्यात आली. डोक्याच्या दुखापतीवर फक्त 500 रुपयांमध्ये उपचार कसे होणार, असा प्रश्न आशा मोरे यांच्या नातेवाईकाने विचारला आहे.
 

Web Title: Slab collapsed on the head of a woman in a queue on the Andheri station, Rs 500 for treatment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.