आरटीओला दाखवा मोबाइल!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2018 05:32 AM2018-08-20T05:32:35+5:302018-08-20T05:33:14+5:30

डिजी लॉकरमधील कागदपत्रे ग्राह्य धरा; परिवहन आयुक्तालयाचे आदेश

Show RTO mobile! | आरटीओला दाखवा मोबाइल!

आरटीओला दाखवा मोबाइल!

googlenewsNext

मुंबई : वाहनचालकांना, विशेषत: दुचाकीस्वारांना रोखल्यानंतर वाहनाच्या मूळ कागदपत्रांची मागणी वाहतूक पोलीस आणि आरटीओ अधिकाऱ्यांकडून करण्यात येते. मात्र, गाडीत कागदपत्रे नसल्यामुळे अनेक वेळा दंड भरण्याची सक्ती केली जाते. त्यामुळे कधी वादाचे प्रसंगही उद्भवतात. हे टाळण्यासाठी ‘डिजी’ लॉकरमधील कागदपत्रे वाहन चालकांनी दाखविल्यास ते ग्राह्य धरण्याबाबतचे आदेश नुकतेच परिवहन आयुक्तालयाने दिले आहेत.
वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्यानंतर वाहतूक पोलिसांकडून वाहनचालकांना पकडले जाते. आपत्कालीन प्रसंगी, तसेच नाकाबंदी दरम्यान आरटीओ अधिकाºयांकडून वाहनचालकांकडे वाहन अनुज्ञप्ती (लायसन्स), वाहन नोंदणी प्रमाणपत्राची मागणी करण्यात येते. अशा प्रसंगी इलेक्ट्रॉनिक फॉर्ममध्ये कागदपत्रे उपलब्ध असल्यास, संबंधित वाहनचालकाकडून पुस्तक रूपातील कागदपत्रांची मागणी न करण्याच्या सूचना ८ आॅगस्ट रोजी केंद्र शासनाच्या रस्ते, वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने दिल्या होत्या. या सूचनेनुसार परिवहन आयुक्तलयाकडून १८ आॅगस्ट रोजी डिजी लॉकरसंबंधी आदेश काढण्यात आला आहे.
परिवहन आयुक्त शेखर चन्ने यांच्या आदेशानुसार, डिजी लॉकर अ‍ॅपचा वापर करून वाहनचालक अनुज्ञप्ती (लायसन्स), वाहन नोंदणी प्रमाणपत्राची डिजिटल कॉपी मोबाइलमध्ये जतन करू शकतात. वाहतूक विभागाच्या अधिकाºयांनी कागदपत्रांची मागणी केल्यास डिजी लॉकरमधील कागदपत्रे दाखवू शकतात. संबंधित कार्यालयांनी डिजी लॉकरमधील कागदपत्रे ग्राह्य धरावी, तसेच त्यांच्याविरुद्ध केंद्रीय मोटार वाहन अधिनियम १९८८च्या कलम १३०, १७० अन्वये कारवाई करण्यात येऊ नये, असेही आदेशात म्हटले आहे.

जनजागृती करण्याचेही आदेश
नागरिकांमध्ये डिजी लॉकरबाबत जनजागृती करण्याचे आदेश परिवहन आयुक्त चन्ने यांनी पोलीस आयुक्त व पोलीस अधीक्षक यांनी दिले आहेत. ७ सप्टेंबर २०१६ रोजी केंद्र शासनाच्या रस्ते, वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने इलेक्ट्रॉनिक फॉर्ममध्ये कागदपत्रे उपलब्ध करून देण्यासाठी डिजी लॉकर मोबाइल अ‍ॅप ही सुविधा नागरिकांसाठी सुरू केली होती.

Web Title: Show RTO mobile!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.