मुंबईतील सभेत ट्रिपल तलाकसंदर्भात बोलत असताना असदुद्दीन ओवैसींवर फेकली चप्पल  

By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2018 08:14 AM2018-01-24T08:14:55+5:302018-01-24T08:45:16+5:30

दक्षिण मुंबईतील नागपाडा परिसरात झालेल्या सभेदरम्यान एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांच्यावर एका व्यक्तीनं चप्पल फेकण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची घटना घडली आहे.

shoe hurled at aimim chief asaduddin owaisi during mumbai rally accused identified | मुंबईतील सभेत ट्रिपल तलाकसंदर्भात बोलत असताना असदुद्दीन ओवैसींवर फेकली चप्पल  

मुंबईतील सभेत ट्रिपल तलाकसंदर्भात बोलत असताना असदुद्दीन ओवैसींवर फेकली चप्पल  

Next

मुंबई - दक्षिण मुंबईतील नागपाडा परिसरात झालेल्या सभेदरम्यान एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांच्यावर एका व्यक्तीनं चप्पल फेकण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली आहे. मंगळवारी (23 जानेवारी) हा प्रकार घडला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या हल्ल्यात ओवैसी यांना कोणतीही दुखापत झालेली नाही. असदुद्दीन ओवैसी यांच्यावर चप्पल फेकणा-या व्यक्तीची ओळख पटवण्यात आली आहे. मात्र अद्याप त्याला अटक करण्यात आलेली नाही. मंगळवारी रात्री 9.45 वाजण्याच्या सुमारास असदुद्दीन ओवैसी ट्रिपल तलाक कायद्याबाबत बोलत असताना सभेमध्ये अचानक लोकांमधून ओवैसींच्या दिशेनं चप्पल भिरकावण्यात आली. या घटनेनंतर काही काळ गोंधळ झाल्याने ओवैसींनी काही क्षणांसाठी आपले भाषण थांबवले.  

''तिहेरी तलाकचे विधेयक संसदेत रखडल्यामुळे निराश झालेल्या लोकांकडून हा हल्ला करण्यात आला.  तलाकवर सरकारचा निर्णय जनतेने विशेषत: मुस्लिमांनी स्वीकारला नाही. पण मी लोकहितासाठी लढणारा नेता आहे. अशाप्रकारे द्वेष करणाऱ्या माणसांना घाबरत नाही. अशा हल्ल्यांनी आमचा आवाज दाबला जाऊ शकत नाही'', असे या हल्ल्यासंदर्भात बोलताना ओवेसी यांनी सांगितले.

चप्पल फेकणाऱ्याबाबत बोलताना ओवैसी म्हणाले की, "हे लोक महात्मा गांधी, गोविंद पानसरे आणि नरेंद्र दाभोलकर यांच्या मारेकऱ्यांच्या विचारधारेचं अनुकरण करणारे आहेत."

दरम्यान,  केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने तिहेरी तलाक बंदीसाठी आणलेला कायदा इस्लामविरोधी आहे. सर्व आघाड्यांवर अपयश आल्यामुळेच जनतेचे लक्ष विचलित करण्यासाठीच भाजपाकडून तिहेरी तलाकचा मुद्दा पुढे केला जात असल्याची टीका एमआयएमचे नेते खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी मंगळवारी केली. नागपाडा जंक्शन येथे एमआयएमकडून आयोजित जलशात ते बोलत होते.
मुस्लिमांसाठी शरियत सर्वोच्च आहे. तिहेरी तलाकच्या नावाखाली शरियतमध्ये ढवळाढवळ केली जात असल्याचा आरोप ओवैसी यांनी केला. मुस्लिमांचा कैवार घेणा-या काँग्रेस, समाजवादी पार्टीसारख्या पक्षांनीही तिहेरी तलाकबाबत संसदेत भूमिका घेण्याचे टाळले.

या पक्षातील नेते खासगीत मोदींना रोखण्याची भाषा करतात, प्रत्यक्षात तिहेरी तलाकसारख्या विषयांवर बोलायची वेळ येते तेव्हा मौन धारण करतात, असा आरोपही ओवेसी यांनी केला. मात्र, एमआयएम शरियतमधील ही ढवळाढवळ सहन करणार नसल्याचा इशाराही त्यांनी दिला.
तिहेरी तलाकचे विधेयक संसदेत मांडले जात असताना काँग्रेससह सर्व तथाकथित धर्मनिरपेक्ष पक्षाचे नेते गप्प होते. केवळ एमआयएमनेच
या मुद्द्यावर मुस्लिमांची बाजू मांडण्याचा प्रयत्न केला होता, असे सांगत ओवेसी यांनी काँग्रेसवरही निशाणा साधला. या वेळी एमआयएमचे आमदार वारिस पठाण, इम्तियाज जलिल यांच्यासह पक्षाचे नेते, पदाधिकारी उपस्थित होते.

Web Title: shoe hurled at aimim chief asaduddin owaisi during mumbai rally accused identified

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.