करी रोड स्थानकात लोकलवर कोसळली फूटओव्हर ब्रिजचं बांधकाम करणारी मशीन (फोटो स्टोरी)

By ऑनलाइन लोकमत on Wed, January 03, 2018 7:46pm

मध्य रेल्वेच्या करी रोड स्थानकामध्ये लोकलवर फूटओव्हर ब्रिजचं बांधकाम कारणारी मशीन कोसळली आहे. त्यामुळं काही वेळासाठी लोकल ठप्प झाली होती. सुदैवानं या घटनेमध्ये कोणतीही हानी झाली नाही. 

मुंबई - मध्य रेल्वेच्या करी रोड स्थानकामध्ये लोकलवर फूटओव्हर ब्रिजचं बांधकाम करणारी मशीन कोसळली आहे. त्यामुळे काही वेळासाठी लोकल सेवा ठप्प झाली होती. सुदैवानं या घटनेमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. 

करी रोड स्थानकावर फूट ओव्हर ब्रिजचं काम सुरू असताना अचानक लोकलवर मशीन कोसळली.  काही वेळानंतर सोशल मीडियावर पूल कोसळल्याच्या अफवा पसरल्या. पण प्रत्यक्षात मात्र तसे काही झालेलं नाही. त्यामुळे अफवावर विश्वास ठेवू नये, असं आवाहन रेल्वे प्रशासनानं केलं आहे. सध्या मध्य रेल्वेची वाहतूक सुरळीत सुरू आहे.  

दरम्यान, गेल्यावर्षी एल्फिन्स्टन पुलावरील चेंगराचेंगरीत  २३ प्रवाशांचा बळी गेला होता. करी रोड, आंबिवलीतील वाढत्या गर्दीमुळे तेथेही नवा पूल बांधण्याच काम सुुरु आहे.लष्कराची यंत्रणा वेळेत काम करेल, असे मुख्यमंत्र्यी देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे. जलद काम होण्यासाठी रेल्वे आणि लष्कराच्या अभियंत्यांनी संयुक्त जबाबदारी हाती घेतली आहे. 

चेंगराचेंगरीची दुर्घटना झालेल्या एल्फिन्स्टन रोड तसेच करी रोड आणि आंबिवली स्थानकांवरील नवे पादचारी पूल लष्कर बांधणार आहे.  

३१ जानेवारीला प्रवाशांसाठी खुला एल्फिन्स्टन पूल बांधण्याचे काम ५ नोव्हेंबरपासून सुरू होईल. ३१ डिसेंबरला पायाभरणी होईल. ३१ जानेवारीपर्यंत सर्व कामे संपवून पूल प्रवाशांसाठी खुला होईल, अशी माहिती रेल्वेमंत्र्यांनी दिली.

संबंधित

१० किलो एमडी ड्रग जप्त; दोघांना अटक 
सावधान... फेसबुकवर अनोळखी व्यक्तीशी मैत्री करताय, हि मैत्री पडू शकते महाग !
पैसे दिले नाही म्हणून व्यसनी मुलाने घेतला गळफास लावून 
डायबेटिसला कंटाळून वृद्ध महिलेने केली आत्महत्या 
मंजुळा शेट्ये प्रकरण : राष्ट्रीय मानवी हक्क आयोग सोमवारी भायखळा जेलची पाहणी करणार 

मुंबई कडून आणखी

मुंबईच्या समुद्रकिनारी लाटांचे तांडव
...म्हणूनच मुंबईसह इतर शहरे जात आहेत पाण्याखाली!
माथेरानमध्ये देशातील सर्वाधिक पाऊस, स्कायमेटचा दावा
मोडकसागर भरला, दोन दरवाजे उघडले
भायखळा कारागृहात आज मानवी हक्क आयोग

आणखी वाचा