भाजप 2, काँग्रेसच्या एका नगरसेवकांचे पद रद्द; नगरसेविकेला दिलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: April 2, 2019 02:07 PM2019-04-02T14:07:31+5:302019-04-02T14:28:14+5:30

मुंबई उच्च न्यायालयाचा महत्वपूर्ण निकाल

Shivsena's 2, Congress corporator termination of mumbai municiple corporation | भाजप 2, काँग्रेसच्या एका नगरसेवकांचे पद रद्द; नगरसेविकेला दिलासा

भाजप 2, काँग्रेसच्या एका नगरसेवकांचे पद रद्द; नगरसेविकेला दिलासा

Next

-  मनोहर कुंभेजकर


मुंबई : मुंबई महानगर पालिकेतील 5 नगरसेवकांच्या जातीच्या दाखल्यावर आज मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती रणजित मोरे आणि भारती डांगरे यांच्या खंडपीठाने महत्वपूर्ण निकाल दिला आहे. त्यामुळे दुसऱ्या क्रमांकावरील शिवसेना 2, काँग्रेसच्या एका उमेदवाराला नगरसेवक पदाची संधी मिळणार आहे. प्रभाग क्रमांक 67 च्या भाजपा नगरसेविका अॅड. सुधा सिंग यांना न्यायालयाने त्यांचा जातीचा दाखला वैध ठरवत त्यांना दिलासा दिला आहे. तर प्रभाग क्रमांक 90 मधील काँग्रेसच्या नगरसेविका ट्युलिप मिरांडा यांनी सादर केलेले जात प्रमाणपत्र परत न्यायालयाने फेर तपासणीसाठी जात पडताळणी समितीकडे पाठवले आहे.

मुंबई महानगर पालिकेतील प्रभाग क्रमांक २८ मधील काँग्रेसच नगरसेवक राजपती यादव, प्रभाग क्रमांक ७६ मधील भाजपच्या नगरसेविका केशरबेन पटेल, प्रभाग क्रमांक ८१ मधील भाजपचे नगरसेवक मुरजी पटेल यांनी सादर केलेले जातीचे दाखले बनावट असल्याने न्यायालयाने त्यांचे नगरसेवकपद रुद्ध झाल्याचा निकाल दिला. जात पडताळणी समितीच्या निर्णयाला या  नगरसेवकांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे.

त्यामुळे दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या प्रभाग क्रमांक 28-मध्ये एकनाथ हुंडारे (शिवसेना), प्रभाग क्रमांक  -76 मध्ये नितिन बंडोपंत सलाग्रे ( काँग्रेस), प्रभाग क्रमांक  -81 मध्ये संदीप नाईक (शिवसेना) यांना पालिकेत नगरसेवकपदाची संधी मिळणार आहे.
दरम्यान काँग्रेसच्या प्रभाग क्रमांक 32 च्या नगरसेविका स्टेफी किणी यांचे नगरसेवक पद गेल्या 18 डिसेंबरला मुंबई उच्च न्यायालयाने रद्द केल होते.
त्यामुळे  दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या प्रभाग क्रमांक 32 च्या शिवसेनेच्या उमेदवार गीता किरण भंडारी यांना देखिल पालिकेत नगरसेवकपदाची संधी मिळणार आहे.
सध्या मुंबई महापालिकेत शिवसेनेचे 93,भाजपा 85, काँग्रेस 31, राष्ट्रवादी काँग्रेस 9, समाजवादी 6, एमआयएम 2 आणि मनसे 1 असे नगरसेवकांचे  संख्याबळ आहे.

Web Title: Shivsena's 2, Congress corporator termination of mumbai municiple corporation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.