शिवसेनेच्या पारड्यात दोन जागा भाजपा, राष्ट्रवादीने गड राखले!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2018 02:13 AM2018-05-25T02:13:53+5:302018-05-25T02:13:53+5:30

प्रत्येक पक्षाने दुसऱ्या पक्षाची मते फोडली.

Shivsena pada two seats in the BJP, NCP maintained the elections! | शिवसेनेच्या पारड्यात दोन जागा भाजपा, राष्ट्रवादीने गड राखले!

शिवसेनेच्या पारड्यात दोन जागा भाजपा, राष्ट्रवादीने गड राखले!

Next

मुंबई : स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघातून विधानपरिषदेसाठी झालेल्या निवडणुकीत व्यक्तिगत संबंध व मोठ्या प्रमाणात झालेल्या लक्ष्मीदर्शनाने पक्षीय राजकारणावर मात करत प्रत्येक पक्षाने दुसऱ्या पक्षाची मते फोडली. पाचपैकी शिवसेनेने पहिल्यांदा २ जागा पटकावल्या तर भाजपा व राष्टÑवादीनेही मतांची फाटाफूट करून आपापल्या जागा कायम राखल्या. कोकणाची जागा राष्टÑवादीचे अनिल तटकरे यांच्याकडे होती त्या जागी माजी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांचे पुत्र अनिकेत तटकरे विजयी झाले, तर हिंगोली परभणीतून शिवसेनेचे विप्लव बाजोरिया यांनी अन्य पक्षांच्या मतांवर डल्ला मारून विजय खेचून आणला. नाशिकमध्येही शिवसेनेचे नरेंद्र दराडे यांनी शेवटच्या क्षणी आ. छगन भुजबळ यांची मदत घेतली
आणि अन्य पक्षाची असंख्य मते फोडून विजय हस्तगत केला. चंद्रपूरमध्ये भाजपाचे रामदास अंबटकर यांना निसटता विजय मिळाला असून, तेथे बाद झालेल्या मतांची संख्या पहाता हा विजय भाजपाला इशारा देणारा ठरला आहे. अमरावतीत काँग्रेसची १२८ मते असताना तेथे पक्षाच्या उमेदवारला फक्त १७ मते मिळाली. ही पडझड काँग्रेससाठी चिंतेचा विषय बनली आहे. तेथे भाजपाचे राज्यमंत्री प्रवीण पोटे दणदणीत मतांनी विजयी झाले आहे.
कोकणात शिवसेनेचा सफाया करण्यासाठी काँग्रेस, राष्टÑवादी, शेकाप, स्वाभिमान असे सगळे पक्ष एकत्र आले. त्यांसाठी भाजपानेही स्वत:ची मते राष्टÑवादीला दिल्याचे दिसते. नाशिकमध्ये भाजपाने शिवसेनेला साथ न देता राष्ट्रवादीला पाठिंबा दिला. पण शिवसेनेने भुजबळांमार्फत राष्टÑवादीची मदत घेतली. हिंगोली-परभणीत शिवसेनेने काँग्रेस, राष्टÑवादीच्या मतांवर डल्ला मारला.

Web Title: Shivsena pada two seats in the BJP, NCP maintained the elections!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.