शिवसेनेच्या नगरसेवकाचे सदस्यत्व अखेर रद्द, जात प्रमाणपत्र अवैध

By ऑनलाइन लोकमत | Published: August 8, 2018 02:55 AM2018-08-08T02:55:26+5:302018-08-08T02:55:36+5:30

प्रभाग क्र. ९१चे शिवसेना नगरसेवक सगुण नाईक यांचे नगरसेवकपद रद्द करण्यात आले आहे.

Shivsena corporator's membership canceled, cast certificate invalid | शिवसेनेच्या नगरसेवकाचे सदस्यत्व अखेर रद्द, जात प्रमाणपत्र अवैध

शिवसेनेच्या नगरसेवकाचे सदस्यत्व अखेर रद्द, जात प्रमाणपत्र अवैध

Next

मुंबई : प्रभाग क्र. ९१चे शिवसेना नगरसेवक सगुण नाईक यांचे नगरसेवकपद रद्द करण्यात आले आहे. त्यांनी सादर केलेले जातीचे प्रमाणपत्र जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने अवैध ठरविल्यानंतर त्यांचे सदस्यत्व रद्द करण्याचा निर्णय कोकण विभागीय आयुक्तांनी दिला होता. याबाबतची घोषणा महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी पालिका महासभेत केली़
२०१७च्या महापालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक ९१मधून शिवसेनेचे उमेदवार सगुण नाईक निवडून आले होते; परंतु त्यांनी सादर केलेल्या जात प्रमाणपत्राबाबत दुसऱ्या क्रमांकावरील काँग्रेसचे उमेदवार रफिक शेख यांनी आक्षेप नोंदवत कोकण विभागीय आयुक्तांकडे तक्रार केली होती़ त्यानंतर नाईक यांना जात प्रमाणपत्र वैधतेबाबतचे पुरावे सादर करण्याचे निर्देश देण्यात आले होते. परंतु त्यांच्याकडे कोणतेही पुरावे नसल्याने त्यांचे जातप्रमाणपत्र अवैध ठरविण्यात आले़
>दुसºयांदा नगरसेवकपदाची संधी
२०१२च्या निवडणुकीत समाजवादीचे लालजी यादव सांताक्रुझमधून निवडून आले होते. परंतु त्यांचे जातप्रमाणपत्र अवैध ठरल्याने दुसºया क्रमांकावरील काँग्रेसचे उमेदवार रफिक शेख यांना विजयी घोषित करण्यात आले होते़
सगुण नाईक यांचे पद रद्द झाल्यामुळे दुसºया क्रमांकावर असलेल्या शेख यांना दुसºयांदा नगरसेवक पद मिळण्याची शक्यता आहे.
>पालिकेतील
पक्षीय बलाबल
शिवसेना - ९३ (चार अपक्षांसह), भाजपा - ८६, काँग्रेस - ३०, राष्ट्रवादी काँग्रेस - ०९, मनसे - ०१, समाजवादी पक्ष - ०६, एमआयएम- ०२

Web Title: Shivsena corporator's membership canceled, cast certificate invalid

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.