शहिदांच्या पत्नीला शासकीय जमीन, कायदेशीर वारसांनाही लाभ देण्याचा निर्णय'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2018 05:33 AM2018-06-24T05:33:32+5:302018-06-24T05:33:35+5:30

शहीद सैनिकांच्या पत्नीला दोन हेक्टर शेतीयोग्य जमीन देण्याच्या राज्य मंत्रिमंडळाच्या निर्णयाला आणखी व्यापक करून आता

Shahid's wife decides to give government land, legal heirs to benefit | शहिदांच्या पत्नीला शासकीय जमीन, कायदेशीर वारसांनाही लाभ देण्याचा निर्णय'

शहिदांच्या पत्नीला शासकीय जमीन, कायदेशीर वारसांनाही लाभ देण्याचा निर्णय'

Next

मुंबई : शहीद सैनिकांच्या पत्नीला दोन हेक्टर शेतीयोग्य जमीन देण्याच्या राज्य मंत्रिमंडळाच्या निर्णयाला आणखी व्यापक करून आता भारतीय सैन्यासह सशस्त्र दलातील शहीद सैनिकांच्या पत्नी अथवा कायदेशीर वारसालाही अशा स्वरूपाचा लाभ देण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी घेतला आहे. या निर्णयामुळे शहिदाची पत्नी हयात नसल्यास कायदेशीर वारसास लाभ मिळणार आहे.
युद्ध, युद्धजन्य परिस्थिती तसेच देशातील सर्वच क्षेत्रांतर्गत सुरक्षासंबंधी मोहिमा, चकमकी, दहशतवादी हल्ले तसेच देशाबाहेरील मोहिमेत धारातीर्थी पडलेल्या राज्यातील सैनिकांच्या पत्नीला शेतीयोग्य दोन हेक्टर जमीन देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने २० मार्च रोजी घेतला होता. आता या निर्णयात कायदेशीर वारस असा बदल समाविष्ट करण्यात आला आहे.

Web Title: Shahid's wife decides to give government land, legal heirs to benefit

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.