शिवडी पश्चिम तहानलेली; अवघे सहा हंडे मिळते पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2019 04:30 AM2019-05-18T04:30:21+5:302019-05-18T04:30:30+5:30

शिवडी पश्चिमेतील भागात दिवाळीनंतर पाणीकपातीस सुरुवात झाली.

Sewri thirsty west; Only six handles get water | शिवडी पश्चिम तहानलेली; अवघे सहा हंडे मिळते पाणी

शिवडी पश्चिम तहानलेली; अवघे सहा हंडे मिळते पाणी

Next

मुंबई : संध्याकाळी चारनंतर हातातली सर्व कामे सोडून घरात धावतपळत शिरून हंडे, कळशी पाइप आणि पाण्याची मोटार अगदी तयार ठेवून नळाकडे आस लावून बसलेल्या शिवडी पश्चिमेतील रहिवाशांची व्यथा मुंबईतील अन्य डोंगराळ भागातील वस्त्यांपेक्षा वेगळी नाही. दिवसभराच्या घरगुती कामकाजासाठी अवघे सहा हंडे तर काही ठिकाणी केवळ दोन हंडे मिळतात. विद्यार्थ्यांना परीक्षेच्या काळातही अभ्यास सोडून तर ज्येष्ठ नागरिकांना आपले वय विसरून पाणी भरावे लागते.
शिवडी पश्चिमेतील भागात दिवाळीनंतर पाणीकपातीस सुरुवात झाली. काही भागांत दोन तास पाणी सोडण्यात यायचे. मात्र, दिवाळीनंतर काही दिवसांनी दोन तासांचे दीड तास करण्यात आले. गणेशनगर येथील अंदाजे ३०० घरांसाठी अवघे दोन तास पाणी सोडण्यात येते. तर वागेश्वरीनगर येथील अंदाजे १८० घरांसाठी दीड तास पाणी सोडण्यात येते. या वेळेत मोठ्या मुश्कीलीने दोन किंवा तीन हंडे भरून पाणी मिळते. या पाण्यातच दिवसभराच्या गरजा भागवायच्या असतात.

गरजा भागतील एवढी काळजी घेण्यात येते...
गणेशनगर व वागेश्वरीनगर येथील रहिवाशांना यापूर्वी आवश्यकतेपेक्षा अधिक पाणीपुरवठा करण्यात येत होता. मात्र, आता १० टक्के पाणीकपात करण्यात आल्याने त्यांच्या वास्तविक गरजेपेक्षा थोडे कमी पाणी सोडण्यात येते. मात्र, त्यांची गरज भागेल एवढी काळजी महापालिका घेते, असे महापालिकेच्या एका अधिकाऱ्याने सांगितले.

- गणेशनगर व वागेश्वरीनगर हे डोंगरावर वसलेले आहे. जेमतेम एक व्यक्ती जाऊ शकते, एवढे अरुंद बोळ... नळाला पाणी आले नाही, तर जवळच्या महापालिकेच्या शाळेजवळ असलेल्या नळातून पाणी भरायचे किंवा कुणाकडून तरी एक हंडा उधार मागायचा. डोंगर त्यातून अरुंद रस्ते यामुळे या ठिकाणी पाण्याचा टँकर पोहोचणे अशक्यच.
- गणेशनगर व वागेश्वरीनगर या दोन्ही नगरांच्या पाठी मोठमोठे टॉवर उभारण्यात आले आहेत. हे टॉवर जेव्हापासून उभे राहिले तेव्हापासून पाणीपुरवठा कमी झाला, असाही आरोप येथील काही रहिवाशांनी केला.
- पाण्याच्या समस्येबाबत स्थानिक नगरसेवक व महापालिकेमध्ये अनेक चकरा मारल्या तरी काहीही साध्य झाले नाही. पाण्याचा दाब कमी असल्याने काही करू शकत नाही, असे येथील नगरसेवक व महापालिका अधिकारी सांगत असल्याचे येथील रहिवासी सांगतात.

Web Title: Sewri thirsty west; Only six handles get water

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Waterपाणी