म्हाडातील सात अभियंत्यांनी वार्षिक बदली झुगारली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2018 06:14 AM2018-06-11T06:14:48+5:302018-06-11T06:14:48+5:30

महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणातील (म्हाडा) ४३३ अधिकारी- कर्मचाऱ्यांच्या वार्षिक बदल्या करण्यात आल्या आहेत.

Seven engineers of MHADA have slipped an annual transfer | म्हाडातील सात अभियंत्यांनी वार्षिक बदली झुगारली

म्हाडातील सात अभियंत्यांनी वार्षिक बदली झुगारली

Next

मुंबई  - महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणातील (म्हाडा) ४३३ अधिकारी- कर्मचाऱ्यांच्या वार्षिक बदल्या करण्यात आल्या आहेत. त्यापैकी सात अभियंत्यांनी बदलीच्या ठिकाणी हजर न होता परस्पर झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणात (एसआरए) प्रतिनियुक्ती करून घेतली आहे. त्याशिवाय म्हाडाच्या तीन विभागांतर्गत बहुतांश मोक्याच्या ठिकाणच्या काही बदल्यांमध्ये साटेलोटे झाल्याची चर्चा म्हाडात सुरू आहे.
म्हाडा प्रशासनाने यंदा ४३३ अभियंते-कर्मचाºयांच्या बदल्या केल्या आहेत. त्यात ३ कार्यकारी अभियंता, ६२ उपअभियंता १२३ सहायक शाखा अभियंता, १९ मिळकत व्यवस्थापक, ६ वास्तुविशारद व भूमापक, ५९ साहाय्यक, ११२ वरिष्ठ लिपिक, १५ लेखापाल आणि २९ चतुर्थ श्रेणी कर्मचाºयांचा त्यात समावेश आहे. ७ अभियंत्यांनी बदलीच्या ठिकाणी हजर न होता परस्पर शासनाकडून प्रतिनियुक्तीवर झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणात (एसआरए) बदली करून घेतली आहे.

वर्षभरात मूळ ठिकाणी बदली
मुंबई दुरुस्ती व पुनर्बांधणी विभागाच्या (आरआर बोर्ड) (पुंगा) विभागातील एका मिळकत व्यवस्थापकावर आरोप झाल्याने त्यांची गेल्या वर्षी मुंबई मंडळात बदली केली होती. मात्र वर्षभरात आता पुन्हा त्याच जागी त्यांची नियुक्ती करण्यात आल्याने म्हाडाच्या वर्तुळात तो चर्चेचा विषय बनला आहे.

Web Title: Seven engineers of MHADA have slipped an annual transfer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.