ज्येष्ठ व्हायोलिनवादक पंडित डी. के. दातार यांचे निधन 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2018 08:27 AM2018-10-11T08:27:02+5:302018-10-11T08:27:39+5:30

प्रसिद्ध व्हायोलिनवादक पद्मश्री डी. के दातार यांचे बुधवारी रात्री निधन झाले.

Senior Violinist Pandit D. K. Datar passed away | ज्येष्ठ व्हायोलिनवादक पंडित डी. के. दातार यांचे निधन 

ज्येष्ठ व्हायोलिनवादक पंडित डी. के. दातार यांचे निधन 

Next

मुंबई - प्रसिद्ध व्हायोलिनवादक पद्मश्री डी. के दातार यांचे बुधवारी रात्री निधन झाले. ते 86 वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे, सुना आणि नातवंडे असा परिवार आहे. गेल्या काही दिवसांपासून आजारी असलेल्या दातार यांनी गोरेगाव येथील रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार करण्यात येतील. 
हिंदुस्थानी संगीतामध्या गायकी अंगाने व्हायोलिन वाजवण्याची पद्धत रुजवण्याचे श्रेय पंडित दातार यांना जाते. त्यांच्या संगीत क्षेत्रातील योगदानासाठी त्यांना 1996 साली संगीत नाटक अकादमी पुरस्कार, 1998 साली महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार तर 2004 साली पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.  
 

Web Title: Senior Violinist Pandit D. K. Datar passed away

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.