मुंबई विद्यापीठाची सिनेट निवडणूक ७ फेब्रुवारीला,  विविध मतदान केंद्रांवर मतदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 12, 2018 02:10 AM2018-01-12T02:10:00+5:302018-01-12T02:10:13+5:30

मुंबई विद्यापीठाच्या अधिसभेवर (सिनेट) महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ नुसार १० प्राचार्य, ६ व्यवस्थापन प्रतिनिधी, ३ विद्यापीठ अध्यापक आणि विविध अभ्यास मंडळांवर प्रत्येकी ३ महाविद्यालयीन विभागप्रमुखांच्या जागांसाठी निवडणूक कार्यक्रम विद्यापीठाने जाहीर केला आहे.

The Senate election of the University of Mumbai will be held on February 7, polling at various polling stations | मुंबई विद्यापीठाची सिनेट निवडणूक ७ फेब्रुवारीला,  विविध मतदान केंद्रांवर मतदान

मुंबई विद्यापीठाची सिनेट निवडणूक ७ फेब्रुवारीला,  विविध मतदान केंद्रांवर मतदान

googlenewsNext

मुंबई : मुंबई विद्यापीठाच्या अधिसभेवर (सिनेट) महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ नुसार १० प्राचार्य, ६ व्यवस्थापन प्रतिनिधी, ३ विद्यापीठ अध्यापक आणि विविध अभ्यास मंडळांवर प्रत्येकी ३ महाविद्यालयीन विभागप्रमुखांच्या जागांसाठी निवडणूक कार्यक्रम विद्यापीठाने जाहीर केला आहे. ७ फेब्रुवारीला विविध मतदान केंद्रांवर मतदान पार पडणार असून ९ फेब्रुवारी २०१८ ला मतमोजणी केली जाणार आहे.
या चार अधिकार मंडळांच्या निवडणुकींच्या अधिसूचनेनुसार, उमेदवारांना त्यांचा अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत रविवार २१ जानेवारी २०१८ अशी असून २२ जानेवारीला उमेदवारी अर्जांची छाननी होईल. उमेदवारी अर्जाच्या वैधतेबाबत कुलगुरूंकडे २३ जानेवारीला अपील करण्यात येईल. अर्ज मागे घेण्यासंबंधी लेखी कळविण्याची मुदत २५ जानेवारी असून २६ जानेवारीला उमेदवारांची यादी प्रसिद्ध होईल. विद्यापीठाच्या संकेतस्थळावर तसेच ६६६.े४२ील्लं३ी.्रल्ल या अधिकृत संकेतस्थळावर यादी उपलब्ध करून दिली जाणार आहे.


९ तारखेला मतमोजणी
७ फेब्रुवारी २०१८ रोजी या अधिकार मंडळाच्या निवडणुकीसाठी विविध मतदान केंद्रांवर मतदान केले जाणार असून मतदान केंद्रांची नावे संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जाणार आहेत. तसेच ९ फेब्रुवारी २०१८ रोजी मतमोजणी केली जाणार असल्याचे कुलसचिव (प्र), निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. दिनेश कांबळे यांनी सांगितले.

Web Title: The Senate election of the University of Mumbai will be held on February 7, polling at various polling stations

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.