अनैतिक संबंधातून सुरक्षारक्षकाची हत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 12, 2018 05:09 AM2018-06-12T05:09:54+5:302018-06-12T05:09:54+5:30

पत्नीशी अनैतिक संबंध असल्याच्या रागात एका सुरक्षारक्षकाने त्याच्या सहकाऱ्याची हत्या केली. त्यानंतर स्वत:च फिर्यादी बनून, साहब मेरे साथी को किसीने मार डाला.. असे त्याने पोलिसांना सांगितले. मात्र एमआयडीसी पोलिसांनी अवघ्या दोन तासांत या हत्येचा उलगडा करत वशिष्ठ पांडे (३४) याला अटक केली.

Security Guard murder | अनैतिक संबंधातून सुरक्षारक्षकाची हत्या

अनैतिक संबंधातून सुरक्षारक्षकाची हत्या

Next

मुंबई : पत्नीशी अनैतिक संबंध असल्याच्या रागात एका सुरक्षारक्षकाने त्याच्या सहकाऱ्याची हत्या केली. त्यानंतर स्वत:च फिर्यादी बनून, साहब मेरे साथी को किसीने मार डाला.. असे त्याने पोलिसांना सांगितले. मात्र एमआयडीसी पोलिसांनी अवघ्या दोन तासांत या हत्येचा उलगडा करत वशिष्ठ पांडे (३४) याला अटक केली.
अंधेरी एमआयडीसीमध्ये सन फार्मा प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीत वशिष्ठ पांडे सुरक्षारक्षक म्हणून काम करतो. त्याच्याच सोबत विजय शुक्ला (३०) हा कार्यरत होता. एमआयडीसी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी सकाळी पांडे पोलीस ठाण्यात गेला आणि ‘मेरे साथी को किसी ने मार डाला,’ असे त्याने पोलिसांना सांगितले. त्यानुसार परिमंडळ १०चे पोलीस उपायुक्त नवीनचंद्र रेड्डी आणि एमआयडीसी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेश पासलवर यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक जाधव, देवरे आणि पथकाने पांडेसह घटनास्थळी धाव घेतली.
शुक्लाच्या डोक्यावर लोखंडी रॉडने हल्ला करून त्याची हत्या करण्यात आली होती. पांडे हा पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करीत होता. मात्र त्याच्या अंगावर असलेले रक्ताचे डाग पोलिसांनी पाहिले आणि त्याचीच उलट तपासणी सुरू केली. सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे देणा-या पांडेने अखेर खुनाची कबुली दिली. शुक्लाचे पांडेच्या पत्नीसोबत अनैतिक संबंध होते. ही बाब पांडेला समजली. त्यावरून त्याचे पत्नीसोबत खटके उडायचे. त्याने अनेकदा दोघांनाही समजविण्याचा प्रयत्न केला. मात्र तरीदेखील दोघे संपर्कात होते. त्यामुळे अखेर त्याने शुक्लाचा काटा काढण्याचे ठरविले. रविवारी रात्री १२च्या सुमारास त्याने शुक्लाची हत्या केली आणि सकाळी पोलीस ठाणे गाठले. मात्र एमआयडीसी पोलिसांनी अवघ्या दोन तासांत मारेकºयाला गजाआड केले.

Web Title: Security Guard murder

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.