सयामी जुळे लव्ह आणि प्रिन्सवरील शस्त्रक्रिया यशस्वी

By ऑनलाइन लोकमत | Published: February 5, 2018 05:30 PM2018-02-05T17:30:16+5:302018-02-05T17:37:22+5:30

सयामी जुळ्यांना वेगळे करण्यासाठी झालेल्या शस्त्रक्रियेला सहा आठवडे उलटले असून, आता लव्ह आणि प्रिन्स या जुळ्या भावंडांना परळच्या बाई जेरबाई वाडिया  रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात येणार आहे. 

sayami twins love and prince successful surgery | सयामी जुळे लव्ह आणि प्रिन्सवरील शस्त्रक्रिया यशस्वी

सयामी जुळे लव्ह आणि प्रिन्सवरील शस्त्रक्रिया यशस्वी

googlenewsNext
ठळक मुद्देवाडिया रुग्णालयात १२ डिसेंबर, २०१७ रोजी झाली  यशस्वी शस्त्रक्रिया फुफ्फुस, पोटातील आतडे व पोटाखालील भागापासून  चिकटलेल्या अवस्थेतील या जुळ्या मुलांवर 12 तास शस्त्रक्रिया एक वर्षानंतर हाडांच्या फेररचनेसाठी एक शस्त्रक्रिया करावी लागणार 

मुंबई: सयामी जुळ्यांना वेगळे करण्यासाठी झालेल्या शस्त्रक्रियेला सहा आठवडे उलटले असून, आता लव्ह आणि प्रिन्स या जुळ्या भावंडांना परळच्या बाई जेरबाई वाडिया  रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात येणार आहे. लव्ह आणि प्रिन्स यांचे यकृत, आतडे आणि मूत्राशय ही तीन इंद्रिये सामाईक होती व तिच या शस्त्रक्रियेव्दारे वेगळी करण्यात रुग्णालयाला यश आले आहे. ही दोन्ही बाळं आता आधार घेऊन उभं राहत असून लवकरच चालायला लागतील.

वाडिया रुग्णालयातील डॉक्टर म्हणतात, “वैद्यकीय परिभाषेत त्यांना झिफीओंफलॉयशिओपॅगस, टेट्रापस जोडलेली जुळी असे म्हणतात. ही मुलांची प्रकृती शस्त्रक्रियेनंतर सामान्य होईपर्यंतचा काळ स्थिर पणदीर्घ होता. आठवडाभर ती कृत्रिम श्वासयंत्रणेवर होती आणि मग तीन आठवडे अतिदक्षता विभागात होती. त्यांच्या जखमा बऱ्या करणेही खूप कठीण होते. कारण, त्यांचे पोट उघडूनन ठेवलेले होते आणि ते केवळजाळीने झाकलेले होते. भुल देऊन त्यांना अनेकदा ड्रेसिंग करण्यात आले. निर्वात ड्रेसिंग्ज आणि कोलेजनचा उपयोग करून त्यांना ड्रेसिंग करण्यात येत होते आणि आश्चर्य म्हणजे कोणतीही गुंतागुंत न होता ते यातून बाहेर आले. जखमा आता जवळपास भरून आल्या आहेत आणि हे कुटुंब आता घरी जाण्यासाठी तयार आहे. या मुलांना आता दोघांत मिळून एक डायपर वापरावे लागणार नाही, खरे तर डायपर्स वापरावेचलागणार नाहीत. कारण, त्यांच्या वयाच्या इतर मुलांप्रमाणे आता त्यांना लघवी आणि प्रात्यविधी नियंत्रण आले आहे. 

या मुलांच्या फॉलोअपसाठी बहुअंगी पुनर्वसन कार्यक्रम तयार करण्यात आला आहे. यामध्ये त्यांची वाढ, विकास, पोषण, यकृताचे कार्य, लसीकरण आणि त्यांच्या कमरेखालील अवयवांसाठी व्यायाम यांचा समावेश करण्यात आला आहे. आणखी एक वर्षाने हाडांच्या फेररचनेसाठी (ऑस्टिओटॉमी)त्यांच्यावर आणखी एक शस्त्रक्रिया करावी लागेल. यामध्ये त्यांची उदरे पुन्हा एकदा बंद केली जातील आणि मग ते शब्दश: धावत शाळेत जाऊ शकतील.”

वाडिया रुग्णालयाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉमिनी बोधनवाला म्हणाल्या“सयामी जुळ्यांना वेगळे करण्याची आमच्याकडील ही तिसरी यशस्वी शस्त्रक्रिया. या बाळांना रुग्णालयातून घरी सोडलेजाणार आहे हे सांगताना मला खूपच आनंद वाटत आहे. या मुलांची केसही आमच्यासाठी खूप आव्हानात्मक होती पण आमच्या वैद्यकीय पथकाने आणि  कर्मचा-यांनी या रुग्णांची खूप छान काळजीघेतली आणि आता ते घरी जाण्यास तयार आहेत.

तुमची मेहनत आणि प्रयत्न योग्य दिशेने होत असतील, तर जगात अशक्य असे काहीच नाही, यावर वाडिया रुग्णालयातील आमचा सर्वांचा विश्वास आहे. या बाळांना आता फिजिओथेरपी दिली जात आहे आणिभविष्यकाळात त्यांना डॉक्टर्ससोबत व्यवस्थित फॉलो-अपसाठी नियमित बोलावले जाईल. हा आमच्या मुकुटातील आणखी एक शिरपेच आहे असे म्हणायला काहीच हरकत नाही”.

पालकशीतल आणि सागर झाल्टे म्हणतात“आमच्या बाळांना आधार घेऊन, अडखळत अडखळत उभे राहताना बघून आम्हाला खूप आनंद होत आहे. ते दोघे अगदी निरोगी आणि आनंदीआहेत. त्यामुळे आम्ही आता घरी जाणार आहोत.  आमच्या बाळांची रिकव्हरी उत्तम आहे. डॉक्टर्स आणि परिचारिकांनी आमच्या बाळांची केवळ अतिदक्षता विभागातच नव्हे, तर वॉर्डातही उत्तमकाळजी घेतली आणि आम्ही अगदी मनापासून त्यांचे आभार मानतो. आजच्या जगात वाडिया रुग्णालयासारख्या संस्था अस्तित्वात आहेत याचा आम्हाला आनंद आहे. आमच्या बाळांवरशस्त्रक्रिया करणे खूप आव्हानात्मक होते आणि रुग्णालयाने ते अविरत प्रयत्नांनी साध्य केले. रुग्णालयाने आमच्याकडून आतापर्यंत एक पैसाही घेतलेला नाही. आम्ही आयुष्यभर वाडियारुग्णालयाचे आभारी राहू.”

Web Title: sayami twins love and prince successful surgery

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.