साठे महामंडळाचा एमडी बावनेला गुजरातेत अटक

By यदू जोशी | Published: December 27, 2017 05:33 AM2017-12-27T05:33:34+5:302017-12-27T05:33:55+5:30

मुंबई : लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळातील कोट्यवधी रुपयांच्या घोटाळ्यांत तब्बल ११ गुन्ह्यांमध्ये हवा असलेला महामंडळाचा तत्कालीन व्यवस्थापकीय संचालक श्रावण किसन बावने याला आज सकाळी गुजरातमधील राजकोट येथे सीआयडीच्या पथकाने अटक केली. तो अडीच वर्षांपासून फरार होता.

Sathe Mahamandal's MD arrested in Bavane in Guwahati | साठे महामंडळाचा एमडी बावनेला गुजरातेत अटक

साठे महामंडळाचा एमडी बावनेला गुजरातेत अटक

Next

मुंबई : लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळातील कोट्यवधी रुपयांच्या घोटाळ्यांत तब्बल ११ गुन्ह्यांमध्ये हवा असलेला महामंडळाचा तत्कालीन व्यवस्थापकीय संचालक श्रावण किसन बावने याला आज सकाळी गुजरातमधील राजकोट येथे सीआयडीच्या पथकाने अटक केली. तो अडीच वर्षांपासून फरार होता.
या महाघोटाळ्यातील मुख्य आरोपी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा आमदार रमेश कदम सध्या आर्थर रोड जेलमध्ये आहे. त्याच्याशी संगनमत करून घोटाळ्यांमध्ये सामील असल्याचे आरोप बावने याच्यावर आहेत. लोकमतने हे घोटाळे एकामागून एक उघडकीस आणल्यानंतर बावने फरार झाला होता. तेव्हापासून तो देशभर नाव बदलून आणि वेशांतर करून फिरत होता, अशी माहिती आहे. आज त्याला सीआयडीच्या पुणे येथील पथकाने राजकोटमध्ये शिताफीने अटक केली.
बावनेच्या अटकेने अनेक प्रकारची धक्कादायक माहिती हाती येण्याची शक्यता आहे. बावनेपूर्वी व्यवस्थापकीय संचालक असलेला इंगळे याला आधीच वर्षभरापूर्वीच अटक करण्यात आले आहे. बावनेवर खटले दाखल असलेल्या प्रत्येक ठिकाणी त्याला चौकशीसाठी नेले जाणार
बोरीवली पोलीस ठाण्यात दाखल ३१२ कोटी रुपयांच्या घोटाळ्याचे प्रकरण, भंडारा २७.६५ कोटी, बुलडाणा १२ कोटी आणि १.८६ कोटी, जालना ११ कोटींचा अपहार, बीड, परभणी, हिंगोली २० कोटी आणि सोलापुरातील गाडीवाटप व ५ लाख रुपयांचा अपहार या प्रकरणांमध्ये बावने सीआयडीला हवा आहे.
रमेश कदम आणि बावनेने संगनमत करून महामंडळाला कोट्यवधी रुपयांचा चुना लावला. त्यांच्या या कटात आणखी कोण कोण सामील होते याची माहिती आता बावनेकडून काढण्याचा प्रयत्न सीआयडी करणार आहे. आता अनेक धक्कादायक बाबी समोर येतील, असा विश्वास विशेष सरकारी वकील प्रवीण चव्हाण यांनी लोकमतशी बोलताना व्यक्त केला.
गॅरेजमध्ये होता कामाला
एकेकाळी पैशांमध्ये लोळणारा श्रावण बावने हा राजकोटमध्ये एका गॅरजेमध्ये मॅकॅनिकच्या हाताखाली काम करत होता. सीआयडीच्या पथकाने त्याला पकडले तेव्हा तो मळलेले कपड्यात होता.
>राज्यमंत्र्याचा दर्जाच नव्हता
या महाघोटाळ्याची चौकशी करणाºया सीआयडीला एक धक्कादायक माहिती अशी मिळाली आहे की रमेश कदम याला साठे महामंडळाचा अध्यक्ष म्हणून राज्यमंत्र्याचा दर्जा कधीही नव्हता. तत्कालिन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी त्याला राज्यमंत्री पदाचा दर्जा देण्याची विनंती असलेली फाईल फेटाळली होती. तरीही कदम हा लाल दिव्याची गाडी घेऊन सर्रास फिरत असे.

Web Title: Sathe Mahamandal's MD arrested in Bavane in Guwahati

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.