सराईत खिसेकापूला रंगेहाथ अटक  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 19, 2017 05:38 AM2017-10-19T05:38:47+5:302017-10-19T05:39:08+5:30

गर्दीने खचाखच भरलेल्या बसमध्ये चढून प्रवाशांचे खिसे कापून चोरी करणाºया चाँद खान (३४) या चोराला दहिसर पोलिसांनी सोमवारी रंगेहाथ अटक केली.

 Saraiat puskacca full stuck arrest | सराईत खिसेकापूला रंगेहाथ अटक  

सराईत खिसेकापूला रंगेहाथ अटक  

Next

मुंबई : गर्दीने खचाखच भरलेल्या बसमध्ये चढून प्रवाशांचे खिसे कापून चोरी करणाºया चाँद खान (३४) या चोराला दहिसर पोलिसांनी सोमवारी रंगेहाथ अटक केली.
सोमवारी रुट क्रमांक ७०७ या गर्दीने भरलेल्या बसमध्ये खान चढला आणि पुढे उभ्या असलेल्या एका प्रवाशाच्या खिशातून त्याने ५०० रुपये काढले. मात्र, आपल्या खिशात कोणीतरी हात घालत असल्याची जाणीव त्या प्रवाशाला झाली. त्यामुळे त्याने लगेचच मागे वळून पाहिले. त्याचदरम्यान खानच्या मागे उभ्या असलेल्या प्रवाशांनी खानला चोरीचा प्रयत्न करताना पाहिले होते. तेव्हा त्यांनी त्या प्रवाशाला डोळ्यांनीच इशारा करत खानबाबत सांगितले.
खान आपल्या खिशातून पैसे काढू पाहात असल्याचे समजताच त्या प्रवाशाने आरडाओरड करण्यास सुरुवात केली. त्यामुळे बसचालकाने बस थांबवली. सणांचे वातवरण असल्याने सर्वत्र पोलिसांचा बंदोबस्त आहे. त्यामुळे बस थांबताच तसेच त्या बसमधून प्रवाशांच्या आरडाओरडीचा आवाज ऐकताच तेथे असलेले पोलीस बसमध्ये चढले. मागे प्रवासी आणि पुढे पोलीस यामुळे खानला पळता आले नाही. पोलिसांनी शिताफीने त्याला शिताफीने अटक केली.

पाच गुन्ह्यांची उकल
सणासुदीला गर्दीच्या बसमध्ये चढून प्रवाशांचे खिसे कापले जात असल्याच्या अनेक तक्रारी पोलिसांकडे येत असतात. या खिसेकापूंकैकी खान हा सराईत खिसेकापू आहे. त्याच्यावर भांडुप तसेच पंतनगर परिसरात अशाच प्रकारचे गुन्हे दाखल आहेत. तर त्याने दहिसरमधून केलेल्या अशाच प्रकारच्या पाच गुन्ह्यांची उकल करण्यात तपास अधिकाºयांना यश मिळाले आहे.

 

Web Title:  Saraiat puskacca full stuck arrest

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.