महालक्ष्मी येथील धोबीघाट बिल्डरच्या घशात घालण्याचा घाट, संजय निरुमप यांचा आरोप   

By ऑनलाइन लोकमत | Published: November 1, 2018 08:05 PM2018-11-01T20:05:43+5:302018-11-01T20:06:18+5:30

मुंबईतील महालक्ष्मी स्टेशन जवळ असलेल्या धोबीघाट परिसरातील धोबीघाट एसआरए योजनेंतर्गत बिल्डरच्या घशात घालण्याचा घाट राज्यातील भाजपा सरकार आणि मुंबई महानगरपालिकेने घातल्याचा आरोप मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी केला.  

Sanjay Nirumap News | महालक्ष्मी येथील धोबीघाट बिल्डरच्या घशात घालण्याचा घाट, संजय निरुमप यांचा आरोप   

महालक्ष्मी येथील धोबीघाट बिल्डरच्या घशात घालण्याचा घाट, संजय निरुमप यांचा आरोप   

googlenewsNext

मुंबई - मुंबईतील महालक्ष्मी स्टेशन जवळ असलेल्या धोबीघाट परिसरातील धोबीघाट एसआरए योजनेंतर्गत बिल्डरच्या घशात घालण्याचा घाट राज्यातील भाजपा सरकार आणि मुंबई महानगरपालिकेने घातल्याचा आरोप मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी केला.  

 छोटा धोबीघाट येथील धोबीकाम करणाऱ्या धोब्यांच्या कपडे धुवायच्या जागेवर भाजप सरकार आणि मुंबई महापालिकेने ओंकार बिल्डरशी संगनमत करून एसआरए योजने अंतर्गत साईबाबा नगर हा बिल्डिंग प्रकल्प बनवण्याची योजना आखली आहे. मात्र  येथे वर्षानुवर्षे धोबीकाम करणाऱ्या आणि मासे विकणाऱ्या स्थानिक लोकांचा विरोध होत आहे, असे संजय निरुपम यांनी म्हटले आहे. तसेच येथील लोकांच्या भावना आणि समस्या जाणून घेण्यासाठी निरुपम यांनी या परिसराला भेट दिली. 

"झोपडपट्टी विकास योजनेतर्गत महापालिका प्रशासनाने येथे साईबाबा नगर हा एसआरए प्रकल्प उभा करायचा घाट घातला आहे आणि याला मुंबई मनपा आयुक्त अजोय मेहता यांनी परवानगी दिलेली आहे. यात दोन गोष्टींचा उलगडा करणे आवश्यक आहे. त्यातील पहिली गोष्ट म्हणजे एसआरए प्रकल्प हा झोपडपट्टी विकासासाठी वापरला जातो आणि या धोबीघाटात कपडे धुण्याचे काम वर्षानुवर्षे सुरु आहे. इथे झोपड्या नाहीत. दुसरी गोष्ट अशी की, हा धोबीघाट १४० वर्षे जुना आहे. याला मुंबईचा ऐतिहासिक वारसा लाभला आहे. मुंबई इतकाच मुंबईचा धोबीघाटही प्रसिद्ध आहे आणि अशा वास्तूला कोण्या बिल्डरच्या विकासासाठी हानी पोहचवणे हा अन्याय आहे." असे यावेळी निरुपम म्हणाले.  

Web Title: Sanjay Nirumap News

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.