salman khan viral tweets about getting girl | सलमानने उडवली धम्माल; 'लडकी मिल गई' म्हणत नेटकऱ्यांना बनवलं 'मामा'
सलमानने उडवली धम्माल; 'लडकी मिल गई' म्हणत नेटकऱ्यांना बनवलं 'मामा'

मुंबई - बॉलिवूडचा दबंग सलमान खानची प्रेमप्रकरणं नेहमीच चर्चेचा विषय ठरली आहेत. सल्लूमियाँ जेथे कुठे जातो तेथे त्याच्यावर लग्नाबाबतच्या प्रश्नांचा भडीमार केला जातोच. पण लग्न कधी करणार? यावर सलमाननं आतापर्यंत कधीही उघडपणे उत्तर दिलेले नाही. मात्र यावेळी सलमाननं स्वतःच जाहीररित्या हा विषय मांडला आहे. सलमाननं याबाबतची माहिती चक्क ट्विटरवर दिली आहे. 
''मला मुलगी मिळाली'', असे ट्विट त्यानं केले आहे.  

यामुळे सलमान लग्न करतोय की असे त्याच्या चाहत्यांना वाटलं. मात्र सलमाननं काही वेळानंतर लगेचच दुसरे ट्विट करत त्यांची निराशा केली. 'मुझे लडकी मिल गयी', सलमान खानच्या या एका ट्विटनं सोशल मीडियावर चांगलाच धूमाकूळ घातला होता. सल्लूमियाँच्या आयुष्यात येणारी नेमकी 'ती' आहे तरी कोण? याविषयी चाहत्यांनी विचार करण्यापूर्वीच त्यानं दुसरं ट्विट करत याचा खुलासा केला आहे. 
सलमानला लग्नासाठी नाहीत तर आगामी 'लवरात्री' या सिनेमासाठी हिरोईन सापडलीय. अशा पद्धतीनं सलमान खाननं चाहत्यांना पुन्हा एकदा मामा बनवलं आहे.

ट्विटरवर शुभेच्छांचा वर्षाव
या ट्विटनंतर काही वेळातच सलमान खानवर प्रश्नांचा भडीमार सुरू झाला होता. अखेर सलमानला मिळालेली ती मुलगी कोण आहे?, हे जाणून घेण्यासाठी प्रत्येक जण आतुर झाला होता. या पोस्टनंतर सलमान खानवर शुभेच्छांचा वर्षावदेखील झाला. काही वेळानंतर आणखी एक ट्विट करत सलमाननं गुपित फोडलं. ''मुझे लडकी मिल गयी'', म्हणजे लग्नासाठी नाही तर आगामी सिनेमासाठी मुलगी मिळाली, असे सलमाननं सांगितलं.    


18 वर्षांच्या तरुणाच्या भूमिकेत सलमान 
अतुल अग्निहोत्री निर्मित ‘भारत’ या सिनेमामध्ये सलमान खान आता व्यस्त होणार आहे.  सलमानचा हा आगामी सिनेमा अनेकार्थाने खास असणार आहे. कारण या सिनेमात सलमानला आपण एका विशेष भूमिकेत पाहू शकणार आहोत.  यात 18 वर्षांच्या तरुणाच्या  भूमिकेत सलमान दिसणार आहे. 

सध्या सलमान 52 वर्षांचा आहे. आता रिअल लाईफमध्ये पन्नाशी ओलांडलेल्या सलमानला 18 वर्षांचे कसे दाखवणार, असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. तर यासाठी एका खास तंत्राचा वापर करण्यात येणार आहे. होय, ऐज रिडक्शन टेक्निक यासाठी वापरली जाणार आहे. म्हणजेच, ‘मैने प्यार किया’मध्ये जो सलमान आपण पाहिलात, अगदी तसा सलमान ‘भारत’मध्ये आपल्याला दिसणार आहे. या टेक्निकसंदर्भात मेकर्सनी व्हिएफएक्स टीमसोबत चर्चा केली. याच टीमने ‘फॅन’ या चित्रपटात शाहरूखसाठी काम केले होते. आता यंग दिसायचे तर वजनही कमी करणे आलेच. त्यानुसार, पुढच्या काही आठवड्यात सलमानला वजनही कमी करावे लागणार आहे. म्हणजेच सलमानला पुन्हा एकदा जिममध्ये घाम गाळावा लागून कडक डाएट फॉलो करावे लागेल.

शुटिंगची पूर्वतयारी सध्या सुरु आहे. अली अब्बास जफर या सिनेमाचे दिग्दर्शन करणार आहे. अभिनेता व निर्माता अतुल अग्निहोत्री (सलमानची बहीण अलविरा खान हिचा पती) दीर्घकाळापासून या सिनेमाचं प्लानिंग करतोय. पण कुठल्या ना कुठल्या कारणाने हा सिनेमा रखडत चालला होता. सर्वप्रथम हा सिनेमा राजकुमार संतोषी यांनीच दिग्दर्शित करावा, असे अतुल व सलमानला वाटत होते.  पण संतोषी यांनी सलमानला बराच काळ प्रतीक्षा करायला लावली. अखेर सलमाननेच आपली वाट बदलवून हा प्रोजेक्ट त्याचा आवडता दिग्दर्शक अली अब्बास जफरकडे सोपवला.  सलमानचा सुपरडुपर हिट ‘सुल्तान’ आणि ‘टायगर जिंदा है’ हे दोन्ही सिनेमेही अली अब्बास जफरने दिग्दर्शित केले आहेत.


Web Title: salman khan viral tweets about getting girl
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.