महाराष्ट्र अ‍ॅक्युपंक्चर काउन्सिल बरखास्त करा- धनंजय मुंडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2018 06:38 AM2018-06-18T06:38:00+5:302018-06-18T06:38:00+5:30

ज्य शासनाने पहिल्यांदाच स्थापन केलेल्या महाराष्ट्र अ‍ॅक्युपंक्चर काउन्सिलमधील अध्यक्ष व सदस्यांच्या नियुक्त्या चुकीच्या पद्धतीने झाल्या असून, त्याची नि:पक्षपातीपणे चौकशी करून, तत्काळ काउन्सिल बरखास्त करण्यात यावी, अशी मागणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी लेखी निवेदनाद्वारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.

Sack Maharashtra Acupuncture Council - Dhananjay Munde | महाराष्ट्र अ‍ॅक्युपंक्चर काउन्सिल बरखास्त करा- धनंजय मुंडे

महाराष्ट्र अ‍ॅक्युपंक्चर काउन्सिल बरखास्त करा- धनंजय मुंडे

googlenewsNext

मुंबई : राज्य शासनाने पहिल्यांदाच स्थापन केलेल्या महाराष्ट्र अ‍ॅक्युपंक्चर काउन्सिलमधील अध्यक्ष व सदस्यांच्या नियुक्त्या चुकीच्या पद्धतीने झाल्या असून, त्याची नि:पक्षपातीपणे चौकशी करून, तत्काळ काउन्सिल बरखास्त करण्यात यावी, अशी मागणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी लेखी निवेदनाद्वारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.
मात्र, अद्याप कारवाई न झाल्यामुळे येत्या पावसाळी विधिमंडळ अधिवेशनात लक्षवेधी सूचनेद्वारे ते सरकारला धारेवर धरणार आहेत. दरम्यान, या प्रकरणी अ‍ॅक्युपंक्चर डॉ. दादाराव डाकले यांनी महाराष्ट्रातील अ‍ॅक्युपंक्चर डॉक्टरांच्या वतीने उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली असून, न्यायालयाने याबाबत झालेल्या सुनावणीत महाराष्ट्र सरकार, वैद्यकीय शिक्षण संचालनालयाचे संचालक डॉ. प्रवीण शिनगारे व काउन्सिलच्या सहा सदस्यांना नोटिसा बजावल्या आहेत.
त्यामुळे हे काउन्सिल ज्या कारणांसाठी स्थापन झालेले आहे तो हेतू साध्य होणार नाही, अशी शंका याचिकेत व्यक्त करण्यात आली, तसेच धनंजय मुंडे यांच्या पत्रातही तसा उल्लेख आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व या विभागाचे मंत्री गिरीश महाजन यांना अंधारात ठेवले गेले असून, त्यांच्याकडून ही नियुक्ती करून घेतली आहे. म्हणूनच या क्षेत्राचे नुकसान टाळण्यासाठी हे काउन्सिल बरखास्त करावे व महाराष्ट्रातील नामवंत तज्ज्ञांना नियुक्त करण्यात यावे, अशी मागणीही धनंजय मुंडे यांनी केली आहे.

Web Title: Sack Maharashtra Acupuncture Council - Dhananjay Munde

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.