धावत्या लोकलमध्ये किकी चॅलेंज करणारे अखेर सापडले

By ऑनलाइन लोकमत | Published: August 9, 2018 08:53 AM2018-08-09T08:53:56+5:302018-08-09T09:09:30+5:30

धावत्या ट्रेनमध्ये किकी चॅलेंज करणं तीन तरुणांना चांगलंच महागात पडलं आहे.

RPF Arrest 3 Youngsters For Performing Kiki Challenge On Running Train | धावत्या लोकलमध्ये किकी चॅलेंज करणारे अखेर सापडले

धावत्या लोकलमध्ये किकी चॅलेंज करणारे अखेर सापडले

Next

मुंबई - जगभरातील तरुणाईला वेड लावलेल्या किकी चॅलेंजने भारतातील लोकांनाही भूरळ पाडली आहे. सोशल मीडियावर या चॅलेंजची धूम पाहायला मिळत असताना अशाच एक प्रकार मुंबईमध्ये ही घडला होता. धावत्या ट्रेनमध्ये किकी चॅलेंज करणं तीन तरुणांना चांगलंच महागात पडलं आहे. तरुणांनी किकी चॅलेंजचा एक व्हिडीओ त्यांनी सोशल मीडियावर अपलोड केला होता. त्यानंतर पोलिसांनी कारवाई करत विरारमधून तिघांना अटक केली आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विरार स्टेशनवरील प्लॅटफॉर्म क्रमांक १ वर लोकल ट्रेनमध्ये किकी चॅलेंज पूर्ण केल्याचा एक व्हिडीओ समोर आला होता. पश्चिम रेल्वेच्या आरपीएफने विरारमधून निशांत (20), ध्रूव शाह (23) आणि श्याम शर्मा (24) या तिघांना बुधवारी (8 ऑगस्ट) अटक केली आहे. धावत्या ट्रेनमध्ये किकी चॅलेंज करणाऱ्या तरुणाचा एक व्हिडीओ जोरदार व्हायरल झाला होता.

ध्रूव शहा आणि त्याच्या दोन मित्रांनी हा व्हिडिओ तयार केला होता. या व्हिडिओत एक तरुण लोकलमधून खाली उतरतो आणि प्लॅटफॉर्मवर डान्स करायला लागतो. त्यानंतर पुन्हा तो धावत्या लोकलमध्ये चढताना दिसत आहे. पश्चिम रेल्वेने या व्हिडिओची दखल घेत कारवाईचा निर्णय घेतला होता. त्यानुसार तीन तरुणांना अटक करण्यात आली आहे. पश्चिम रेल्वेच्या आरपीएफचे विभागीय आयुक्त अनूप शुक्ला यांनी किकी चॅलेंजचा व्हिडिओ समोर येताच तरुणांचा शोध घेण्यास सुरुवात केल्याचं सांगितलं. खबरींच्या मदतीने तरुणांबद्द्ल माहिती मिळताच पोलिसांनी तिघांसाठी सापळा रचला आणि बुधवारी त्यांना अटक केल्याची माहिती दिली. 

Web Title: RPF Arrest 3 Youngsters For Performing Kiki Challenge On Running Train

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.