मुंबईतील वाढत्या रस्ते अपघातांना लगाम!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2018 06:05 AM2018-06-21T06:05:45+5:302018-06-21T06:05:45+5:30

मुंबईतील रस्ते अपघातांमध्ये घट झाल्याची माहिती मुंबई रस्ता सुरक्षा अहवाल २०१७द्वारे समोर आली आहे.

Road to Mumbai increasing road accidents! | मुंबईतील वाढत्या रस्ते अपघातांना लगाम!

मुंबईतील वाढत्या रस्ते अपघातांना लगाम!

Next

मुंबई : मुंबईतील रस्ते अपघातांमध्ये घट झाल्याची माहिती मुंबई रस्ता सुरक्षा अहवाल २०१७द्वारे समोर आली आहे. २०१५च्या तुलनेत २०१७च्या अपघातामध्ये घट झाली आहे. त्यामुळे मुंबईकर रस्ता सुरक्षेबाबत जागरूक होत असल्याचे चित्र आहे. दुसरीकडे अपघातांमध्ये मरण पावलेल्यांमध्ये सर्वाधिक बळी तरुणांचे गेल्याचेही उघडकीस आले आहे.
मुंबई वाहतूक पोलीस, आयआयटी मुबंई आणि ब्लूमबर्ग फिलॅन्थ्रॉपिक इनिशिएटिव्ह फॉर ग्लोबल रोड सेफ्टी यांच्या वतीने मुंबई रस्ता सुरक्षा अहवाल बुधवारी प्रसिद्ध करण्यात आला. वाहतूक पोलीस, आयआयटी मुंबई आणि ब्लूमबर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आलेल्या सर्व्हेक्षणानुसार २०१७मध्ये ४६७ रस्ते अपघात झाले. यात ४९० नागरिकांचा मृत्यू झाला आहे. यापैकी सर्वाधिक अपघाती मृत्यू हे २० ते २४ वयोगटातील आहेत. या वयोगटात ८३ टक्के तरुणांचा आणि १७ टक्के तरुणींचा समावेश आहे.
सर्व्हेनुसार, २०१५च्या तुलनेत २०१७च्या अपघातांमध्ये घट झाली आहे. २०१५मध्ये ५८६ अपघातांमध्ये ६११ नागरिकांचा मृत्यू झाला होता, तर २०१७ मध्ये ४६७ अपघातांमध्ये ४९० नागरिकांचा मृत्यू झाला. म्हणजे २०१५च्या तुलनेत २०१७च्या अपघातांमध्ये २० टक्क्यांनी घट झाली आहे. मुंबईकरांमध्ये रस्ता सुरक्षा नियमांबाबत जागरूकता निर्माण
होत असल्याचे यातून दिसून येत
आहे.
>रस्ते अपघात
वर्ष अपघात मृत्यू
२०११ ५३९ ५६३
२०१२ ४७१ ४८८
२०१३ ५७४ ५९५
२०१४ ५७४ ५९८
२०१५ ५८६ ६११
२०१६ ५२९ ५६२
२०१७ ४६७ ४९०
रस्ते अपघातातील मृत्यूचे प्रमाण खालीलप्रमाणे :
पादचाऱ्यांचा मृत्यू - ५२ टक्के
दुचाकीचालक मृत्यू - २४ टक्के
दुचाकीच्या मागील प्रवाशाचा मृत्यू - १४ टक्के
तीन आणि चारचाकीचालकांचा मृत्यू - ०४ टक्के
तीन आणि चारचाकी वाहनांतील प्रवासी - ०३ टक्के
सायकलचालक - ०२ टक्केवाहनचालकांच्या चुकीमुळे ‘पादचाºयांना’ शिक्षा!
मुंबईतील रस्ते अपघातांमध्ये पादचाºयांचे मृत्यूचे प्रमाण ५२ टक्के असल्याचे सर्वेक्षणात स्पष्ट करण्यात आले आहे.

Web Title: Road to Mumbai increasing road accidents!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.