Maratha Reservation: 'हे आरक्षण टिकणारं नाही; OBCमध्ये उपप्रवर्ग करून मराठ्यांना आरक्षण द्या!'

By ऑनलाइन लोकमत | Published: November 19, 2018 10:55 AM2018-11-19T10:55:40+5:302018-11-19T10:56:51+5:30

विधिमंडळ आणि विधान परिषदेच्या हिवाळी अधिवेशनाला आजपासून (19 नोव्हेंबर) सुरुवात झाली आहे.

Reservation of Maratha community give to creating sub-categories from OBC - Radhakrishna Vikhe-Patil | Maratha Reservation: 'हे आरक्षण टिकणारं नाही; OBCमध्ये उपप्रवर्ग करून मराठ्यांना आरक्षण द्या!'

Maratha Reservation: 'हे आरक्षण टिकणारं नाही; OBCमध्ये उपप्रवर्ग करून मराठ्यांना आरक्षण द्या!'

googlenewsNext
ठळक मुद्देविधिमंडळ आणि विधान परिषदेच्या हिवाळी अधिवेशनाला आजपासून (19 नोव्हेंबर) सुरुवात झाली आहे. अधिवेशनात मराठा समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा तापणार आहे.ओबीसी प्रवर्गात उप प्रवर्ग तयार करून मराठा समाजाला आरक्षण द्या

मुंबईः विधिमंडळ आणि विधान परिषदेच्या हिवाळी अधिवेशनाला आजपासून (19 नोव्हेंबर) सुरुवात झाली आहे. त्यामुळे या अधिवेशनात मराठा समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा तापणार आहे. त्यातच आता विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटलांनी मराठा आरक्षण न्यायालयात टिकण्याचा सोपा मार्ग सुचवला आहे.

ओबीसी प्रवर्गात उप प्रवर्ग तयार करून आरक्षण द्या. ओबीसीतून उप प्रवर्ग तयार करून मराठा समाजाला आरक्षण द्यावं, जेणेकरून ते न्यायालयात टिकेल, असं राधाकृष्ण विखे-पाटील म्हणाले आहेत. तत्पूर्वी विधानसभेच्या परिसरात दाखल होताच विरोधकांनी पायऱ्यांवर बसून आंदोलन केलं आहे.  52 टक्के आरक्षणाला धक्का न लावता मराठा, मुस्लिम, धनगर समाजाला आरक्षण द्या, मागासवर्ग आयोगाचा अहवाल आल्या आल्या सभागृहात पहिल्यांदा सादर करा, अशी मागणी विरोधी पक्षनेत्यांनी विधिमंडळाच्या पायऱ्यांवर बसून घोषणाबाजी करत केली आहे. 

Web Title: Reservation of Maratha community give to creating sub-categories from OBC - Radhakrishna Vikhe-Patil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.