सुटी नाकारल्याने महिला निवडणूक अधिकाऱ्याचा झाला मृत्यू, कुटुंबीयांचा आरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2019 02:20 AM2019-05-12T02:20:05+5:302019-05-12T02:20:14+5:30

लोकसभा निवडणुकीच्या काळात रजा नाकारल्याने काविळीने आजारी असलेल्या राज्य सरकारच्या महिला कर्मचारी प्रीती दुर्वे यांची प्रकृती बिघडली व त्यात त्यांचा मृत्यू झाल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे.

 Rejecting the vacation, the woman's election officer was killed, the family's allegations | सुटी नाकारल्याने महिला निवडणूक अधिकाऱ्याचा झाला मृत्यू, कुटुंबीयांचा आरोप

सुटी नाकारल्याने महिला निवडणूक अधिकाऱ्याचा झाला मृत्यू, कुटुंबीयांचा आरोप

Next

मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या काळात रजा नाकारल्याने काविळीने आजारी असलेल्या राज्य सरकारच्या महिला कर्मचारी प्रीती दुर्वे यांची प्रकृती बिघडली व त्यात त्यांचा मृत्यू झाल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. मात्र, मुंबई शहराचे जिल्हाधिकारी शिवाजी जोंधळे यांनी हा आरोप नाकारला असून, दुर्वे यांनी आजारपणाविषयी माहिती दिलेली नसल्याचा दावा केला आहे.
राज्य सरकारच्या सांस्कृतिक विभागामध्ये कार्यरत असलेल्या दुर्वे या शिवडी विधानसभा क्षेत्रात निवडणूक कर्तव्यावर होत्या. त्यांना कावीळ झाल्याचे निदान झाल्यानंतर त्यांनी रजेचा अर्ज केला होता. मात्र, रजा मिळाली नाही; त्यामुळे त्यांची प्रकृती खालावून त्यांचा मृत्यू झाल्याचा आरोप करण्यात आला आहे.
२९ एप्रिल रोजी मतदानादिवशी त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र उपचार सुरू असतानाच त्यांचे शनिवारी निधन झाले. त्यांना रजा नाकारणाºया अधिकाºयावर कारवाई करण्याची मागणी प्रीती यांचे पती लोकेश दुर्वे यांनी केली असून आर्थिक भरपाईची मागणी केली आहे.

‘सुटीचा अर्ज आला नाही’
मुंबई शहराचे निवडणूक अधिकारी जोंधळे यांनी प्रीती यांच्या निधनाबाबत दु:ख व्यक्त केले. त्यांचा रजेचा अर्ज मिळालेला नसल्याचा खुलासा केला. अर्ज मिळाला असता तर त्यांना रजा देण्यात आली असती, असे त्यांनी स्पष्ट केले.

Web Title:  Rejecting the vacation, the woman's election officer was killed, the family's allegations

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Mumbaiमुंबई