ठळक मुद्देचित्रकलेचे अभ्यासक

डोंबिवली- चित्रकलेचे प्रसारक, अभ्यासू, प्रेमळ शिक्षक रामचंद्र इनामदार (86)रा.पांडुरंगवडी, डोंबिवली पूर्व यांचे वृद्धापकाळाने गुरुवारी निधन झाले. आयुष्यभर मुलींनी शिकावे,  व चित्रकला जीवन हा ध्यास जोपासणारे इनामदार सर हे बालमोहन विद्यालयात 1963 ते1989 अशी तब्बल 30 वर्षे चित्रकलेचे सर म्हणून कार्यरत होते.

साने गुरुजी कथामाला, डोंबिवली शाखा त्यानी सुरू केले होती. निळजे गावाामध्ये त्यांनी 15 वर्षे मुलींच्या शिक्षणासाठी परिश्रम घेतले. तेथे वीट भट्टटीवरील काामगारांच्या मुलाना शिक्षणाचे महत्व पटवून देण्यासाठी त्यांनी प्रचंड कार्य केले. वाचन संस्कृती वाढीस लागावी यासाठी त्यांनी खूप जनजागृती केली. शेकडो विद्यार्थ्यांना त्यांनी संस्काराचे धडे दिले. अबालवृद्धांचे लाडके असे इनामदार सरांंचे व्यक्तिमत्व होते. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगी, चित्रकलेचे प्रसारक मुलगा, सून, नातवंड असा परिवार आहे. डोंबिवलीतील रामनगर स्मशानभूमीत त्यांच्यावर रात्री 9 नंतर अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.