राजधानी, तेजसचा प्रवास होणार ‘गोड-गोड’, आयआरसीटीसीचा उपक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 9, 2018 12:27 AM2018-01-09T00:27:54+5:302018-01-09T00:28:30+5:30

आठवड्यावर आलेल्या मकर संक्रांतीच्या सणासाठी आयआरसीटीसी सज्ज होत आहे. गतवर्षी ‘तेजस’ एक्स्प्रेसनंतर यंदा ‘तेजस’सह ‘राजधानी’ एक्स्प्रेसमध्येही तीळगूळ आणि लाडू वाटण्यात येणार आहेत, तसेच आयआरसीटीसी संचलित छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस बेस किचनमधून १५ जानेवारीपासून प्रीमियम एक्स्प्रेसमध्ये नाश्ता मिळणार असल्याची माहिती आयआरसीटीसीने दिली.

Rajdhani, Tejas travel will be 'God-sweet', IRCTC's initiative | राजधानी, तेजसचा प्रवास होणार ‘गोड-गोड’, आयआरसीटीसीचा उपक्रम

राजधानी, तेजसचा प्रवास होणार ‘गोड-गोड’, आयआरसीटीसीचा उपक्रम

Next

मुंबई : आठवड्यावर आलेल्या मकर संक्रांतीच्या सणासाठी आयआरसीटीसी सज्ज होत आहे. गतवर्षी ‘तेजस’ एक्स्प्रेसनंतर
यंदा ‘तेजस’सह ‘राजधानी’ एक्स्प्रेसमध्येही तीळगूळ आणि लाडू वाटण्यात येणार आहेत, तसेच आयआरसीटीसी संचलित छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस बेस किचनमधून १५ जानेवारीपासून प्रीमियम एक्स्प्रेसमध्ये नाश्ता मिळणार असल्याची माहिती आयआरसीटीसीने दिली.
विदेशी-देशी पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी आयआरसीटीसीकडून विविध
उपक्रम राबविण्यात येतात.
सण-उत्सवानुसार विशेष महत्त्व असलेले पदार्थ प्रवाशांना देण्यात येतात. गणेशोत्सवाला-मोदक, दसºयाला जिलेबी, दिवाळीला
लाडू असे पदार्थ प्रवाशांना देण्यात
येत आहेत. यंदा संक्रांतीच्या मुहूर्तावर प्रवाशांना तीळगूळ आणि लाडू
देण्यात येणार आहेत. आयआरसीटीसीकडून ‘राजधानी’सह ‘तेजस’ आणि ‘दुरांतो’ एक्स्प्रेसमध्ये बेस किचनमधून नाश्ता आणि
जेवण पुरविण्यात येणार आहे.
यापूर्वी आयआरसीटीसी या एक्स्प्रेसमधील प्रवाशांसाठी खासगी कंपनी आणि संबंधित व्यवस्थेकडून नाश्ता पुरवण्यात येत
होता. गतवर्षी आॅक्टोबरमध्ये
‘तेजस’ एक्स्प्रेसमध्ये खासगी कंत्राटदारांकडून पुरविलेल्या
जेवणावर तक्रारी दाखल करण्यात आल्या होत्या.

प्रवाशांनी केली होती मागणी
गतवर्षी गणेशोत्सवात ‘तेजस’ एक्स्प्रेसमध्ये मोदक दिल्यानंतर प्रवाशांनी या उपक्रमाचे कौतुक केले होते, तसेच विविध सणांच्या वेळी विशेष ओळख असलेले पदार्थ देण्याची मागणी प्रवाशांतर्फे करण्यात आली होती.
या धर्तीवर ‘राजधानी’ आणि ‘तेजस’ एक्स्प्रेसमध्ये संक्रांतीनिमित्त तीळगूळ-लाडवांचे वाटप करण्यात येणार आहे, अशी माहिती आयआरसीटीसीचे मुख्य जनसंपर्क अधिकारी पिनाकीन मोरावाला यांनी दिली.

Web Title: Rajdhani, Tejas travel will be 'God-sweet', IRCTC's initiative

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.