मुंबई - एल्फिन्स्टन - परळ स्थानकावर झालेल्या चेंगराचेंगरीच्या घटनेनंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी संताप मोर्चा काढत अनधिकृत फेरीवाल्यांविरोधात कारवाई करण्याची मागणी केली होती. राज ठाकरे यांनी मुंबईतील फेरीवाल्यांना हटविण्यासाठी १५ दिवसांची मुदत दिली होती. राज ठाकरेंची ही मुदत मुदत संपल्यानंतर मनसेच्या कार्यकर्त्यांनी मनसे स्टाईलने खळ्ळ खट्याक आंदोलन करत ठाणे, कल्याण आणि डोंबिवली स्थानकाबाहेर तोडफोड केली. ठाण्यात मनसेच्या कार्यकर्त्यांना अटकही करण्यात आली आहे. दरम्यान मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी फेसबूकच्या माध्यमातून कार्यकर्त्यांचं अभिनंदन केलं आहे. 

राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांचं अभिनंदन करताना महापालिकेवर टीका केली आहे. '१५ दिवसांत रेल्वे स्थानक परिसरातील अनधिकृत फेरीवाले हटवा अन्यथा १६व्या दिवशी आम्ही त्यांना आमच्या पद्धतीने हटवू, असा इशारा मी मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या व्यवस्थापकांना ५ ऑकटोबर २०१७ च्या मोर्च्याच्या वेळी दिला होता. रेल्वेने महापालिका हद्दीचं कारण पुढे करून टाळाटाळ करू नये म्हणून मुंबई महापालिका आयुक्तांची भेट घेऊन त्यांना देखील परिस्थितीची कल्पना दिली होती. तरीही १५ दिवसांत फेरीवाले हटवता आले नाहीत किंवा हटवायची इच्छा नव्हती, म्हणून माझ्या महाराष्ट्र सैनिकांनी त्यांना आमच्या पद्धतीने हटवलं,रेल्वे स्थानक परिसर मोकळा करून दाखवला', असं राज ठाकरे बोलले आहेत.

'प्रशासनाला प्रवाशांचे नाहीत तर फेरीवाल्यांचे हितसंबंध जपायचे आहेत म्हणून अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई करायची सोडून माझ्या महाराष्ट्र सैनिकांना अटक केली त्यांना पोलीस कोठडीत डांबून ठेवलं', असा आरोप राज ठाकरेंनी केला आहे. 

'रेल्वे प्रवाशांसाठी महाराष्ट्र सैनिकांनी जे केलं त्याचा मला अभिमान आहे. मी तुम्हा सर्वांचं मनःपूर्वक अभिनंदन करतो. जिथे जिथे अन्याय दिसेल, गैरप्रकार दिसतील तिथे तिथे माझ्या महाराष्ट्र सैनिकाची लाथ बसणारच', असं राज ठाकरेंनी ठणकावून सांगितलं आहे.

मुंबईतील एलफिन्स्टन रोड स्टेशनवर झालेल्या चेंगराचेंगरीच्या घटनेनंतर राज ठाकरे यांच्या नेतृत्त्वात मनसेने ‘संताप मोर्चा’चं आयोजन केलं होतं. मुंबईतील मेट्रो सिनेमा ते चर्चगेट असा भव्य मोर्चा काढून राज ठाकरे यांनी चर्चगेटमधल्या रेल्वे कार्यालयात आपलं निवेदन रेल्वे प्रशासनाला दिलं.
15 दिवसात पादचारी पूल आणि स्टेशनबाहेरील रस्ते फेरीवालेमुक्त करण्याचं अल्टिमेटम त्यांनी दिलं होतं. 15 दिवसात तसं न झाल्यास 16 व्या दिवशी आपल्या स्टाइलनं पादचारी पूल आणि रस्ता फेरीवालामुक्त करु, असंही राज ठाकरेंनी रेल्वे प्रशासनाला ठणकावलं होतं.  

पोस्टमध्ये राज ठाकरे यांनी आंदोलन केल्यामुळे ज्यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे, त्यांची नावेही दिली आहेत. 

या आंदोलनात ज्यांच्यावर गुन्हे दाखल झाले ते माझे महाराष्ट्र सैनिक - 

ठाणे
अविनाश जाधव, आशिष डोके, रवी सोनार, महेश कदम, संदीप साळुंके, विश्वजित जाधव, सुशांत सूर्यराव.

डोंबिवली 
मनोज प्रकाश घरत, प्रकाश भोईर, प्रल्हाद म्हात्रे,प्रकाश माने,सागर जेधे,रविंद्र गरुड,सिद्धार्थ मातोंडकर,अजय शिंदे,रतिकेश गवळी,गणेश गावडे,कृष्णा देवकर.

सांताक्रूझ 
अखिल चित्रे, संदेश गायकवाड, हेमंत गायकवाड, विनल दरहीकर, चंद्रशेखर मडव, विशाल शिरवाडकर,

वसई 
जयेंद्र पाटील, शिवाजी सुळे, झुबेर पठाण, विद्यानंद पवार, विजय सरदार, नामदेव पाताडे, दिनेश पाटील, आदिल मेमन, इकबाल मेमन, देवान रजक, प्रमोद आसवारे

कल्याण 
अशोक मांडले, उल्हास भोईर, कौस्तुभ देसाई,गणेश चौधरी,जितेंद्र राणे, सचिन शिंदे, सचिन मोरे, महेश भोईर, अंकुश राजपूत, सचिन लोहार, भूषण लांडे, अविनाश तेली

बदलापूर 
उमेश तावडे, संगीता चेंदवणकर, योगेश जाधव, गणेश पिल्लई.

दहिसर 
अनिल खानविलकर, राजेश येरुणकर, विलास मोरे, प्रितेश मांजरेकर, वसंत धोंडगे, रमाकांत मोरे, गणेश पुजारी, सचिन कदम, राजेंद्र कळ्वणकर, शैलेश हातिम, संतोष शिंदे, राजेश कासार