अॅप्रेंटिस विद्यार्थ्यांबाबत राज ठाकरेंनी फोन वगैरे केलेला नाही; मनसेच्या 'इंजिना'ला रेल्वेमंत्र्यांचा धक्का

By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2018 05:16 PM2018-03-23T17:16:03+5:302018-03-23T17:16:03+5:30

अ‍ॅप्रेंटिसशिप केलेल्या विद्यार्थ्यांच्या मागण्यांसंदर्भात राज ठाकरेंशी बोललोच नाही, असा खुलासा रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी केला आहे. तर मनसेकडून राज यांनी या आंदोलनासंदर्भात फोनवरून चर्चा केल्याची माहिती दिली जात आहे.

Raj Thackeray has not made phone so much about Apprentice students; Railway Minister's push to MNS's engine | अॅप्रेंटिस विद्यार्थ्यांबाबत राज ठाकरेंनी फोन वगैरे केलेला नाही; मनसेच्या 'इंजिना'ला रेल्वेमंत्र्यांचा धक्का

अॅप्रेंटिस विद्यार्थ्यांबाबत राज ठाकरेंनी फोन वगैरे केलेला नाही; मनसेच्या 'इंजिना'ला रेल्वेमंत्र्यांचा धक्का

Next

मुंबई-  अ‍ॅप्रेंटिसशिप केलेल्या विद्यार्थ्यांच्या मागण्यांसंदर्भात राज ठाकरेंशी बोललोच नाही, असा खुलासा रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी केला आहे. तर मनसेकडून राज यांनी या आंदोलनासंदर्भात फोनवरून चर्चा केल्याची माहिती दिली जात आहे. काही दिवसांपूर्वी अ‍ॅप्रेंटिसशिप केलेल्या सर्व उमेदवारांना रेल्वेच्या नोकरीत सामावून घेण्याच्या मागणीसाठी विद्यार्थ्यांनी आंदोलन केलं होतं. रेल्वे बोर्ड मागण्यांचा सकारात्मक विचार करेल, असे लेखी आश्वासन प्रशासनाने दिल्यानंतरच तरुणांनी आंदोलन मागे घेतले होतं.

रेल्वेमंत्र्यांनी दिलेल्या आश्वासनानंतर विद्यार्थी मनसेच्या पदाधिका-यांसह थेट मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भेटीला गेले होते. त्यानंतर रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांच्यासोबत चर्चा करण्यासाठी विद्यार्थी प्रतिनिधींसह मनसेचे शिष्टमंडळही दिल्लीसाठी गेलं होते. परंतु आता राज ठाकरे यांच्याशी विद्यार्थ्यांच्या मागण्यांसंदर्भात कोणतीही चर्चा न झाल्याचं खुद्द रेल्वेमंत्र्यांनीच उघड केल्यानं नव्या वादाला तोंड फुटणार आहे.

गेल्या काही दिवसांपूर्वी अ‍ॅप्रेंटिसशिप केलेल्या सर्व उमेदवारांना रेल्वेच्या नोकरीत सामावून घेण्याच्या मागणीसाठी विद्यार्थ्यांनी आंदोलन केलं होतं. दादर-माटुंगा रेल्वे स्थानकादरम्यान सकाळी देशभरातील हजारांवर तरुणांनी तब्बल साडेतीन तास रेल रोको आंदोलन करत मुंबईला रोखून धरलं होतं. रेल्वे बोर्ड मागण्यांचा सकारात्मक विचार करेल, असे लेखी आश्वासन प्रशासनाने दिल्यानंतरच तरुणांनी आंदोलन मागे घेतले. त्यावेळी मनसेनं त्या आंदोलनात उडी घेतली होती. त्यानंतर मनसेनं त्या विद्यार्थ्यांचं शिष्टमंडळ रेल्वेमंत्र्यांच्या भेटीलाही नेलं होतं. रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांच्यासोबत चर्चा करण्यासाठी विद्यार्थी प्रतिनिधींसह मनसेचे शिष्टमंडळही दिल्लीसाठी गेले होते. रेल्वेमंत्र्यांनी दिलेल्या आश्वासनानंतर विद्यार्थी मनसेच्या पदाधिका-यांसह थेट मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भेटीला गेले होते.

तत्पूर्वी मंगळवारी सकाळी प्रशिक्षणार्थींच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी मनसेचे नेते आणि पदाधिकारीही रुळावर उतरले होते. रेल्वेमंत्र्यांनी दिलेल्या आश्वासनानंतर, विद्यार्थी मनसेच्या पदाधिका-यांसह थेट मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भेटीला गेले होते. त्या वेळी मनसेचे नेते तुमच्याबाबत चर्चेसाठी दिल्लीला पाठवित असल्याचे राज यांनी स्पष्ट केले होते. दिल्लीत सर्वांशी नीट आणि शांतपणे बोला, असे आवाहनही राज ठाकरे यांनी केले. दरम्यान, एका प्रशिक्षणार्थीने सांगितले की, रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांच्यासोबत चर्चा करण्यासाठी मनसेतर्फे शिष्टमंडळात बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई, संदीप देशपांडे, मनोज चव्हाण यांचा समावेश आहे. राज ठाकरे यांच्यावर आमचा विश्वास आहे. त्यांनी आश्वासित केले, म्हणजे प्रश्न मार्गी लागण्याचा विश्वास वाटत आहे.

Web Title: Raj Thackeray has not made phone so much about Apprentice students; Railway Minister's push to MNS's engine

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.