महामुलाखतीनंतर शरद पवार आणि राज ठाकरे पुन्हा एकाच मंचावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2018 10:54 AM2018-06-06T10:54:53+5:302018-06-06T13:07:09+5:30

काही दिवसांपूर्वीच संमेलनाचे स्वागताध्यक्ष विनोद तावडे यांनी कृष्णकुंज येथे जाऊन राज ठाकरे यांना संमेलनाचे निमंत्रण दिले होते.

Raj Thackeray and Sharad Pawar on one dias Akhil bhartiya marathi natyasammelan | महामुलाखतीनंतर शरद पवार आणि राज ठाकरे पुन्हा एकाच मंचावर

महामुलाखतीनंतर शरद पवार आणि राज ठाकरे पुन्हा एकाच मंचावर

मुंबई: काही दिवसांपूर्वी पुण्यात झालेल्या महामुलाखतीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे पुन्हा एकाच व्यासपीठावर दिसणार आहेत. ९८व्या अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलन १३ जूनपासून मुलुंडमध्ये सुरू होत आहे. या संमेलनाच्या उद्घाटन सोहळ्याला या दोन्ही नेत्यांना आमंत्रित करण्यात आले आहे. ज्येष्ठ रंगकर्मी सतीश आळेकर यांच्या हस्ते नाट्यसंमेलनाचे उद्घाटन होईल. तर शरद पवार आणि राज ठाकरे या सोहळ्यातील प्रमुख पाहुणे असतील. तर 15 जूनला होणाऱ्या संमेलनाच्या समारोपाला उद्धव ठाकरे आणि सुशीलकुमार शिंदे प्रमुख पाहुणे उपस्थित राहणार आहेत.

या माध्यमातून आयोजकांनी महत्त्वाच्या राजकीय नेत्यांना आणि रंगकर्मींना एकाच व्यासपीठावर आणण्याची किमया साधल्याची चर्चा आहे. काही दिवसांपूर्वीच संमेलनाचे स्वागताध्यक्ष विनोद तावडे यांनी कृष्णकुंज येथे जाऊन राज ठाकरे यांना संमेलनाचे निमंत्रण दिले होते. तर प्रसाद कांबळी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी सोमवारी ‘मातोश्री’वर जाऊन उद्धव ठाकरेंची भेट घेतली होती. तेव्हा उद्धव ठाकरेंनी तत्काळ हे निमंत्रण स्वीकारून समारोप कार्यक्रमाला येण्याचे मान्य करत मुलुंडच्या ९८व्या नाट्यसंमेलनाला शुभेच्छा दिल्या होत्या. त्यामुळे आता नाट्यसंमेलनाच्या व्यासपीठावरून राजकीय फटकेबाजी होणार का, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.


 

Web Title: Raj Thackeray and Sharad Pawar on one dias Akhil bhartiya marathi natyasammelan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.