रेल्वे मुख्यालयातील सुरक्षाव्यवस्था ढिसाळ!; मेल-एक्स्प्रेस टर्मिनसच्या प्रवेशद्वारावरील निम्मे डिटेक्टर बंद

By ऑनलाइन लोकमत | Published: November 20, 2018 03:59 AM2018-11-20T03:59:36+5:302018-11-20T03:59:59+5:30

कालौघात जखमेवर खपली धरली जाते, हे जरी सत्य असले तरी कित्येक जखमा अशा असतात ज्या वर्षानुवर्षे भळभळत राहतात. इतिहासाची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी सतर्क राहण्याचा अनुभव पदरी देतात.

Rail security at the headquarters! The half-detector closes at the entrance of the mail-express terminus | रेल्वे मुख्यालयातील सुरक्षाव्यवस्था ढिसाळ!; मेल-एक्स्प्रेस टर्मिनसच्या प्रवेशद्वारावरील निम्मे डिटेक्टर बंद

रेल्वे मुख्यालयातील सुरक्षाव्यवस्था ढिसाळ!; मेल-एक्स्प्रेस टर्मिनसच्या प्रवेशद्वारावरील निम्मे डिटेक्टर बंद

Next

कालौघात जखमेवर खपली धरली जाते, हे जरी सत्य असले तरी कित्येक जखमा अशा असतात ज्या वर्षानुवर्षे भळभळत राहतात. इतिहासाची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी सतर्क राहण्याचा अनुभव पदरी देतात. अशीच एक जखम म्हणजे १० वर्षांपूर्वी झालेला आणि देशातीलच नव्हेतर, विदेशी नागरिकांचेही काळीज पिळवटून टाकणारा अतिरेकी हल्ला. या हल्ल्याला १० वर्षे पूर्ण होत आहेत. त्या पार्श्वभूमीवर जगातील प्रमुख शहरांपैकी एक आणि देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई शहरातील निवडक ठिकाणांवरील सुरक्षा व्यवस्थेचा घेतलेला हा आढावा..

मुंबई : मध्य रेल्वेचे मुख्यालय छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि पश्चिम रेल्वेचे मुख्यालय असलेल्या चर्चगेट स्थानकावरील मेटल डिटेक्टर कार्यरत नसल्याचे धक्कादायक वास्तव ‘लोकमत’च्या पाहणीत समोर आले. या स्थानकांवरील प्रवेश आणि बाहेर पडण्याच्या ठिकाणी कोणतीही सुरक्षाव्यवस्था नाही.
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसमध्ये प्रवेशासाठी आणि बाहेर पडण्यासाठी पाच मार्ग आहेत. सबवे आणि मेल-एक्स्प्रेस टर्मिनस येथील प्रवेशद्वारांवर अनुक्रमे ६ आणि ८ मेटल डिटेक्टर बसविण्यात आले आहेत. यापैकी निम्मे मेटल डिटेक्टर बंद आहेत. शिवाय सीएसएमटी येथील तिकीट खिडकी प्रवेशद्वारावर कोणत्याही प्रकारची सुरक्षाव्यवस्था नसल्याने थेट सीएसएमटी लोकल स्थानकात सहज प्रवेश करणे सोपे आहे.
मेल-एक्स्प्रेस टर्मिनसवरील दोन बॅग स्कॅनर यंत्रणा वापरात नसल्याचे दिसून आले. मात्र, सीएसएमटी येथे येणाऱ्या वाहनांच्या तपासणीसाठी अंडर व्हेईकल स्कॅनिंग सिस्टिम (यूव्हीएसएस) बसविण्यात आली आहे. येथील यूव्हीएसएसही सुस्थितीत आहे.
चर्चगेट स्थानकात प्रवेश करण्यासाठी आणि बाहेर पडण्यासाठी पाच मार्ग आहेत. यातील सबवेवरील प्रवेशद्वारावर एकूण १० मेटल डिटेक्टर असून यापैकी ३ मेटल डिटेक्टर बंद आहेत. हॉकी स्टेडियमजवळील प्रवेशद्वार, एसएनडीटी महाविद्यालयाजवळील प्रवेशद्वार, चर्चगेट रेल्वे मुख्यालयाच्या इमारतीजवळील प्रवेशद्वार आणि लॉ महाविद्यालयाजवळील प्रवेशद्वारावर सुरक्षाव्यवस्थेबाबत कोणतीच साधने नाही.

सुरक्षारक्षकांसह पोलिसांचा अभाव
प्रवेश आणि बाहेर जाण्याच्या ठिकाणीदेखील कोणताही सुरक्षारक्षक किंवा पोलीस नसल्यामुळे या मार्गाने स्थानकात सहज प्रवेश करणे शक्य आहे. यामुळे चर्चगेट रेल्वे स्थानकातील सुरक्षा व्यवस्था रामभरोसे आहे. स्थानकातील बॅग स्कॅनर कार्यरत असल्याने तेवढीच काय ती जमेची बाजू आहे.

Web Title: Rail security at the headquarters! The half-detector closes at the entrance of the mail-express terminus

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Mumbaiमुंबई