हरुनही राहुल गांधी जिंकले! राज ठाकरेंनी काढला निष्कर्ष

By ऑनलाइन लोकमत | Published: January 23, 2018 07:38 PM2018-01-23T19:38:00+5:302018-01-23T19:47:09+5:30

चार दिवसांपूर्वी हज यात्रेचे अनुदान बंद करण्याच्या मोदी सरकारच्या निर्णयावर व्यंगचित्रातून फटकारे ओढणा-या राज यांनी आज गुजरात विधानसभा निवडणुकीच्या निकालावर व्यंगचित्रातून अत्यंत मार्मिक भाष्य केलं आहे. 

Rahul Gandhi wins! Raj Thackeray conclusion | हरुनही राहुल गांधी जिंकले! राज ठाकरेंनी काढला निष्कर्ष

हरुनही राहुल गांधी जिंकले! राज ठाकरेंनी काढला निष्कर्ष

googlenewsNext
ठळक मुद्देगुजरातमध्ये पुन्हा भाजपाने सत्ता मिळवली असली तरी या निवडणुकीने काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांची राजकीय प्रतिमा उंचावली.राज यांनी तोच धागा पकडत गुजरातमध्ये मोदी-शहांपेक्षा राहुल सरस ठरल्याचे आपले व्यंगचित्रातून दाखवून दिले.

मुंबई - मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे पुन्हा एकदा फेसबुकवर सक्रिय झाले आहेत. चार दिवसांपूर्वी हज यात्रेचे अनुदान बंद करण्याच्या मोदी सरकारच्या निर्णयावर व्यंगचित्रातून फटकारे ओढणा-या राज यांनी आज गुजरात विधानसभा निवडणुकीच्या निकालावर व्यंगचित्रातून अत्यंत मार्मिक भाष्य केलं आहे. 

गुजरातमध्ये पुन्हा भाजपाने सत्ता मिळवली असली तरी या निवडणुकीने काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांची राजकीय प्रतिमा उंचावली हे वास्तव आहे. भाजपाने सरकार स्थापन केले यापेक्षा काँग्रेसची गुजरातमधील कामगिरी सुधारली. राहुल गांधींनी आपले राजकीय चातुर्य दाखवून दिले. राज यांनी तोच धागा पकडत गुजरातमध्ये मोदी-शहांपेक्षा राहुल सरस ठरल्याचे आपले व्यंगचित्रातून दाखवून दिले. या निवडणुकीने राहुल यांची सोशल मीडियावरील पप्पू ही प्रतिमा बदलण्यात महत्वाची भूमिका बजावली. 

एरवी राज ठाकरे आपल्या भाषणांमधून राहुल गांधींची खिल्ली उडवतात पण यावेळी आपल्या व्यंगचित्रातून त्यांनी राहुल यांचे कौतुक केले. गुजरात निवडणुकीने मोदी-शहांना छोटे केले तर राहुल यांची राजकीय उंची वाढवल्याचा निष्कर्ष राज यांनी काढला आहे. 

Web Title: Rahul Gandhi wins! Raj Thackeray conclusion

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.