मेंदूविज्ञानातही छद्मविज्ञान!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 8, 2018 05:15 AM2018-07-08T05:15:05+5:302018-07-08T05:15:19+5:30

मेंदूविज्ञानातल्या छद्मविज्ञानाविषयी आपण जाणून घेत आहोत. फ्रेनॉलॉजीचा उपयोग कसा करत गेले, ते गेल्या वेळी पाहिले.

 Pseudoscience in brain sciences | मेंदूविज्ञानातही छद्मविज्ञान!

मेंदूविज्ञानातही छद्मविज्ञान!

googlenewsNext

- रचना जाधव पोतदार

मेंदूविज्ञानातल्या छद्मविज्ञानाविषयी आपण जाणून घेत आहोत. फ्रेनॉलॉजीचा उपयोग कसा करत गेले, ते गेल्या वेळी पाहिले. मात्र, जसा काळ पुढे गेला, तसे मेंदू, मन, मानवी स्वभाव यावर वैज्ञानिक पद्धतीने संशोधन होतच राहिले. त्यातील सहसंबंध सिद्ध होत गेले, पण मानवी मन आणि स्वभाव हे दोन्हीही मेंदूत होणाऱ्या रासायनिक घडामोडी, प्रक्रिया आणि मेंदूचे असणारे विविध भाग यातील आंतरप्रक्रियेतूनच घडत असे. याबाबतीत वैज्ञानिकांचे मत संशोधनाअंती बनायला लागलं होतं. याविषयी पुढे अनेक घडामोडी घडल्या.
फे्र नॉलॉजीचा कट्टर विरोधक होता प्रसिद्ध फ्रेंच शरीर विज्ञान शास्त्रज्ञ प्येर जॉ फ्लॉरोन्स. कवटीच्या आकारावरून माणसाचं मन कळतं,
या फे्र नॉलॉजीच्या गाभ्यालाच
त्यानं आणि अनेकांनी विरोध दर्शविला. मेंदूचे वेगवेगळे भाग शरीरातल्या आणि मनातल्या विविध वेगळ्या भागाचे नियंत्रण करतात. या गॉलच्या म्हणण्याला ‘फ्लॉरोन्सन’ ‘होलिझम’ या त्याच्या नव्या तत्त्वाद्वारे विरोध केला. त्याच्या मते मेंदूकडे संपूर्ण एकसंध अवयव म्हणून पाहायला हवे. यातील निरनिराळे भाग एकत्रितपणे काम करतात, म्हणून मेंदूला तुकड्या-तुकड्यांत न पाहता एकत्रितपणे आणि एकसंधपणे पाहायला हवे, असे त्याने मांडले. या विचारपद्धतीला ‘होलिझम’ असं म्हणतात.
त्याने प्राण्यांच्या मेंदूवर केलेल्या अनेक प्रयोगातून असे निष्कर्ष काढले की, प्राण्यांच्या मेंदूतला खूप मोठा भाग काढून टाकला, तरी त्या प्राण्यांच्या वर्तनात काहीच
फरक पडत नाही. म्हणून स्पर्श, गंध, वाचा, दृष्टी, श्रवणक्षमता स्मृती आणि इतर अनेक गोष्टीसाठींच्या क्षमता मेंदूमध्ये विविध भागांत विखुरलेल्या असतात आणि त्यासाठी वेगळे भाग नसतात, असे संशोधनाअंती त्याने मांडलं होतं.
गॉल आणि फ्लॉरेन्स यांनी मांडलेल्या मेंदूच्या कार्यपद्धतीबाबत बरीच वर्षे वाद रंगला. पुढील काळात आलेल्या मेंदूवैज्ञानिकांनी भर घातली आणि सरते शेवटी १९व्या शतकातील सर्वच महत्त्वाच्या मेंदूवैज्ञानिकांचं एकमत झालं की, अतिशय मूलभूत आणि सहज-सोप्या क्रियांसाठी मेंदूतील विशिष्ट भागच कार्यान्वित होतात. जसे दृष्टीसाठी ‘ङ्मूू्रस्र्र३ं’ ‘ङ्मुी’ किंवा पश्चखंड हा मेंदूच्या मागील भाग ऐकण्यासाठी ‘३ीेस्रङ्म१ं’ ‘ङ्मुी ’ कुंभखंड हा दोन्हा कानांच्या मागील भाग, परंतु बुद्धी, विचार कारणमीमांसा, स्मृती नियंत्रण केंद्रे मेंदूभर विखुरलेली असतात. अशा पद्धतीने ‘फे्र नॉलॉजी’ की ‘होलिझम’ या वादावर पडदा पडला.
 

Web Title:  Pseudoscience in brain sciences

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :newsबातम्या