प्रीती झिंटा म्हणते; महेंद्रसिंग धोनी आमच्या संघात असता तर....

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2018 10:50 PM2018-05-27T22:50:25+5:302018-05-27T22:55:03+5:30

माझे स्वप्न कधीच प्रत्यक्षात येणार नाही.

Priti zinta regrets says MS Dhoni should be in Kings eleven punjab team | प्रीती झिंटा म्हणते; महेंद्रसिंग धोनी आमच्या संघात असता तर....

प्रीती झिंटा म्हणते; महेंद्रसिंग धोनी आमच्या संघात असता तर....

Next

मुंबई: आयपीएल स्पर्धेतील महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्त्वाखालील चेन्नईच्या संघाचा स्वप्नवत प्रवास पाहून अनेकांना हेवा वाटणे साहजिकच आहे. किंग्ज इलेव्हन पंजाबची मालकीण प्रीती झिंटाही याला अपवाद नाही. नुकत्याच झालेल्या एका कार्यक्रमात तिला चेन्नईच्या संघाविषीय मत विचारण्यात आले. तेव्हा प्रीती झिंटाने म्हटले की, धोनी माझ्या संघात असायला हवा होता, असे म्हटले. मी धोनीची खूप मोठी चाहती आहे. त्यामुळे तो माझ्या संघात हवा, असे मला वाटते. परंतु, हे स्वप्न कधीही प्रत्यक्षात येणार नाही, हे मला माहिती आहे. जेव्हा आयपीएल स्पर्धेची सुरुवात झाली तेव्हा मी धोनीची फॅन नव्हती. मात्र, गेल्या दहा वर्षांत मी धोनीचा प्रवास जवळून बघितला आहे. त्यामुळे धोनी पंजाबच्या संघात असावा, हे माझे स्वप्न असल्याचे प्रीतीने या कार्यक्रमात सांगितले.

आयपीएलच्या अंतिम फेरीत वानखेडेवर फटक्यांचं तुफान आणलं ते चेन्नई सुपर किंग्जच्या शेन वॉटसनने. धडाकेबाज फटकेबाजी करत वॉटसनने सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या अंतिम फेरीत शतक झळकावले आणि चेन्नईने आयपीएलच्या जेतेपदाला गवसणी घातली. वॉटसनने 57 चेंडूंत 11 चौकार आणि आठ षटकारांच्या जोरावर नाबाद 117 धावांची दमदार खेळी साकारली. त्याच्या या खेळीच्या जोरावर चेन्नईने अंतिम फेरीत हैदराबादवर आठ विकेट्स राखून विजय मिळवला. चेन्नईचे हे आयपीएलमधले तिसरे जेतेपद ठरले. यापूर्वी 2010 आणि 2011 साली चेन्नईने आयपीएलचे जेतेपद पटकावले होते.

Web Title: Priti zinta regrets says MS Dhoni should be in Kings eleven punjab team

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.