'गर्भवती महिलांना स्वतंत्र आसन मिळवून देणार'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2019 02:24 AM2019-06-16T02:24:33+5:302019-06-16T02:26:06+5:30

महिला प्रवाशांचा रेल्वे प्रवास सुरक्षित व सुखकारक होण्यासाठी रेल्वे प्रशासन अनेक उपाय योजना करते. मात्र गर्भवती महिलेसाठी स्वतंत्र आसन आरक्षित ठेवण्यासाठी याच प्रशासनाने नकार दिला आहे. 

'Pregnant women will get independent seats' | 'गर्भवती महिलांना स्वतंत्र आसन मिळवून देणार'

'गर्भवती महिलांना स्वतंत्र आसन मिळवून देणार'

Next

- कुलदीप घायवट 

महिला प्रवाशांचा रेल्वे प्रवास सुरक्षित व सुखकारक होण्यासाठी रेल्वे प्रशासन अनेक उपाय योजना करते. मात्र गर्भवती महिलेसाठी स्वतंत्र आसन आरक्षित ठेवण्यासाठी याच प्रशासनाने नकार दिला आहे. यासाठी रेल्वे महिला प्रवाशी संघटनेने रेल्वेकडे निवदेन दिले होते़ कोणत्याही गर्भवती महिलेने ही मागणी केलेली नाही़ त्यामुळे ती पूर्ण करता येणार नाही, असे अजब उत्तर रेल्वेने दिले आहे़ मात्र गर्भवती महिलेला डब्यात स्वतंत्र आसन मिळवून देण्यासाठी संघटना आंदोलन करेल व ते मिळवून देईलच, असा निर्धार संघटनेच्या अध्यक्षा वंदना सोनावणे यांनी केला आहे.

वारंवार होणाऱ्या बिघाडाबद्दल काय सांगाल?
रेल्वे मार्गात दररोज तांत्रिक बिघाड होतात, त्यामुळे प्रवाशांचा महत्त्वाचा वेळ वाया जातो. नुकताच मध्य रेल्वे मार्गावरील मुलुंड स्थानकावर पत्र्याचा शेड पेंटाग्राफला लागल्याने प्रवाशांचा ३० ते ५० मिनिटे वाया गेली. दररोज रेल्वे रुळाला तडा जाणे, ओव्हर हेड वायर तुटणे, तांत्रिक बिघाड, सिग्नल यंत्रणा बिघडणे अशा घटना घडत असल्याने प्रवाशांचे हाल होतात.

रेल्वे प्रशासनाने केलेल्या मान्सून तयारीबद्दल काय सांगाल?
अनेक रेल्वे स्थानकांवरील छतांचे काम अपूर्ण अवस्थेत आहे. त्यामुळे ज्या ठिकाणी छत आहे, अशा ठिकाणी गर्दी जमते. त्यामुळे चेंगराचेंगरी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे रेल्वे प्रशासनाची मान्सून तयारीचे नियोजन चुकत आहे. रेल्वे मार्गात पाणी साचू नये, यासाठी काय उपाययोजना केल्या आहेत, याची प्रवासी संघटनेची बैठक घेऊन माहिती देणे अपेक्षित आहे. मात्र, रेल्वे अधिकारी मीटिंगमध्ये वारंवार व्यस्त असल्याचे सांगितले जाते.

मुंबईची ‘लाइफलाइन’ ही ‘त्रासदायक’ झाली आहे का?
मुंबई उपनगरीय लोकलमधून ८० लाख प्रवासी प्रवास करतात. त्यामुळे लोकल ही प्रत्येकाच्या जवळची आहे. मात्र, रोजचे कोलमडलेल्या वेळापत्रकामुळे, रखडलेल्या प्रकल्पांमुळे ‘लाइफलाइन’ ही ‘त्रासदायक’ झाली आहे. मुंबई उपनगरीय लोकलमधून रेल्वेला लाखों रुपये महसूल मिळते. राजकीय नेत्यांनी रेल्वे प्रवाशांच्या समस्या जाणून घेणे आवश्यक आहे.

रेल्वेला कशाप्रकारे जाब विचारणार?
रेल्वे प्रवासात दररोज प्रवाशांचा मृत्यू होतो. लोकल उशिराने इच्छित स्थानकावर पोहोचते. पुरुषांसह महिला प्रवाशांना लोकलमध्ये धक्के सहन करून प्रवास करावा लागतो. त्यामुळे लोकलचे डबे वाढविणे, लोकलच्या फेºया वाढविणे, फलाटांची लांबी वाढविणे अशा गोष्टी शक्य असताना रेल्वे प्रशासन करत नाही. रेल्वे प्रशासनाला जागे करण्यासाठी स्थानकावर बेमुदत उपोषणाचा बसण्याचा निर्णय घेतला आहे. रेल्वे प्रवाशांचे हाल कमी होण्यासाठी प्रवासी संघटना एकत्र येऊन आंदोलन करणार आहेत.

Web Title: 'Pregnant women will get independent seats'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.