मेट्रो मार्गांच्या कामासाठी २६ जानेवारीला आठ तास वीज खंडित होण्याची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2019 04:36 AM2019-01-25T04:36:04+5:302019-01-25T09:37:27+5:30

मेट्रो मार्ग क्रमांक २ अ दहिसर ते डी.एन. नगरचे विस्तारित काम सध्या सुरू आहे.

The possibility of eight hours of power disruption on January 26 for the construction of Metro routes | मेट्रो मार्गांच्या कामासाठी २६ जानेवारीला आठ तास वीज खंडित होण्याची शक्यता

मेट्रो मार्गांच्या कामासाठी २६ जानेवारीला आठ तास वीज खंडित होण्याची शक्यता

Next

मुंबई : मेट्रो मार्ग क्रमांक २ अ दहिसर ते डी.एन. नगरचे विस्तारित काम सध्या सुरू आहे. टाटा पावर कंपनीची उन्नत उच्च विद्युत वाहिनी (११० केव्ही मार्ग) मध्ये टॉवर नंबर ४१ आणि ४२ चे मोनोपोलमध्ये रूपांतरित करण्यात येणार आहे. त्याबद्दलचे काम मालाड पश्चिमेकडील चारकोप येथून येत्या २६ जानेवारीला रात्री ११ वाजल्यापासून २७ जानेवारीला सकाळी ७ वाजेपर्यंत करण्यात येणार आहे. अदानी विद्युत आणि टाटा पावर आवश्यक नेटवर्क पुनर्संचयित पर्यायी व्यवस्था करत असल्याने विद्युत पुरवठ्यात व्यत्यय येणार नाही. परंतु, कांदिवली पश्चिम, मालाड पश्चिम, गोरेगाव पश्चिम, अंधेरीच्या काही परिसरात विद्युत पुरवठा प्रभावित होऊ शकतो. मेट्रो मार्ग २ अ च्या बांधकामासाठी कार्यान्वित होणाऱ्या कार्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन एमएमआरडीएने केले आहे.

Web Title: The possibility of eight hours of power disruption on January 26 for the construction of Metro routes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Metroमेट्रो