अभिनेत्री चिन्मयीसमोर चालकाचे अश्लील कृत्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2018 06:34 AM2018-02-20T06:34:58+5:302018-02-20T06:35:14+5:30

मराठी अभिनेत्री चिन्मयी सुमीत राघवन हिच्यासमोर एका वाहन चालकाने अश्लील, बीभत्स वर्तन केल्याची घटना सोमवारी सकाळी घडली

Pornographic act of actress Chinmayee | अभिनेत्री चिन्मयीसमोर चालकाचे अश्लील कृत्य

अभिनेत्री चिन्मयीसमोर चालकाचे अश्लील कृत्य

Next

मुंबई : मराठी अभिनेत्री चिन्मयी सुमीत राघवन हिच्यासमोर एका वाहन चालकाने अश्लील, बीभत्स वर्तन केल्याची घटना सोमवारी सकाळी घडली. तिचा अभिनेता पती सुमीत राघवनने स्वत:हून या प्रकाराची माहिती सोशल मीडियावर दिल्यानंतर नेटकºयांनी या कृत्याबाबत टीकेची झोड उठविली. पोलिसांनी या प्रकरणी तत्परतेने तपास करीत चालक जीवन चौधरी (४२) याला अटक केली आहे.
राघवन दाम्पत्य विलेपार्लेतील हॅप्पी होम सोसायटीमध्ये राहतात. या परिसरातच असलेल्या टिळक शाळेजवळून सकाळी अकराच्या सुमारास चिन्मयी जात असताना बाजूला उभ्या असलेल्या पांढºया रंगाच्या बीएमडब्ल्यू कारमध्ये चालक हस्तमैथुन करू लागला. त्यामुळे संतप्त होऊन त्याला मारण्यासाठी चिन्मयी वळल्या असता चालक गाडीतून पळून गेला. त्यांनी त्याच्या कारचा १९८५ हा क्रमांक टिपून घेतला. घडलेला प्रकार पती सुमीत राघवनला सांगितल्यानंतर त्याने तातडीने फेसबुकवर ही माहिती पोस्ट केली. तो जर सापडला असता तर चिन्मयीने त्याच्या मुस्कटात लगावली असती, असेही नमूद केले.
या प्रकाराची दखल मुंबई पोलिसांनी घेत विनयभंगाचा गुन्हा दाखल करीत तातडीने शोध सुरू केला. नंबरवरून बीएमडब्ल्यू मालकाचा शोध घेतला असता तो सुमीत यांचाच शेजारी निघाला. त्याच्याकडे चालक असलेल्या जीवन चौधरीला घटनेनंतर चार तासांत अटक केली. दरम्यान, चौधरीने या घटनेचा इन्कार केला असून अभिनेत्रीचा गैरसमज झाल्याचे विलेपार्ले पोलिसांनी सांगितले.

Web Title: Pornographic act of actress Chinmayee

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.