राज्यातील 1 कोटी 22 लाख बालकांना पोलिओ लस देण्याचे उद्दिष्ट - आरोग्यमंत्री

By ऑनलाइन लोकमत | Published: March 6, 2019 03:48 PM2019-03-06T15:48:21+5:302019-03-06T15:59:09+5:30

राज्यात 10 मार्च रोजी पल्स पोलिओ लसीकरण अभियान राबविण्यात येणार असून सुमारे 1 कोटी 22 लाख बालकांना पोलिओचा डोस देण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.

Polio vaccine aims to provide polio vaccine to 1.25 million children in the state - Health Minister | राज्यातील 1 कोटी 22 लाख बालकांना पोलिओ लस देण्याचे उद्दिष्ट - आरोग्यमंत्री

राज्यातील 1 कोटी 22 लाख बालकांना पोलिओ लस देण्याचे उद्दिष्ट - आरोग्यमंत्री

Next
ठळक मुद्देराज्यात 10 मार्च रोजी पल्स पोलिओ लसीकरण अभियान राबविण्यात येणार असून सुमारे 1 कोटी 22 लाख बालकांना पोलिओचा डोस देण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.राज्यभर 82 हजार 719 पोलिओ बूथ उभारण्यात येणार आहे. 1 कोटी 21 लाख 60 हजार 63 बालकांना यावर्षी डोस देण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.

मुंबई - राज्यात 10 मार्च रोजी पल्स पोलिओ लसीकरण अभियान राबविण्यात येणार असून सुमारे 1 कोटी 22 लाख बालकांना पोलिओचा डोस देण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. त्यासाठी राज्यभर 82 हजार 719 पोलिओ बूथ उभारण्यात येणार आहे. 0 ते 5 वयोगटातील सर्व मुला-मुलींना पोलिओचा डोस द्यावा, असे आवाहन आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज केले.

दरवर्षी वर्षातून दोन वेळेस पोलिओची विशेष लसीकरण मोहीम राबविण्यात येते. या मोहिमेसाठी राज्यभर जनजागृती मोहीम हाती घेण्यात यावी, असे निर्देश आरोग्यमंत्र्यांनी यंत्रणेला दिले आहे. दरम्यान, पोलिओ लसीकरण मोहिमेसंदर्भात आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदिप व्यास यांच्या अध्यक्षतेखाली राज्य कृती दलाची आज आढावा बैठक झाली. यावेळी मोहिमेसंदर्भात विविध विभागांनी करावयाच्या कार्यवाहीबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

गेल्या वर्षी सुमारे 1 कोटी 20 लाख 98 हजार बालकांना पोलिओ डोस देऊन 99.7 टक्के उद्दिष्ट पूर्ण करण्यात आले होते. यावर्षी 1 कोटी 21 लाख 60 हजार 63 बालकांना डोस देण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. सुमारे 82 हजार 719 पोलिओ बूथ उभारण्यात येणार असून त्यासाठी 2 लाख 19 हजार 313 एवढा कर्मचारी वर्ग नियुक्त करण्यात आला आहे. 16 हजार 548 पर्यवेक्षकांची नेमणूक करण्यात आली आहे. या अभियानांतर्गत 2 कोटी 92 लाख 19 हजार 543 घरांना भेटी देऊन पोलीओ डोस देण्याचे निश्चित करण्यात आले आहे. 13 हजार 927 मोबाईल टीम संपूर्ण दिवसभर कार्यरत राहतील.

पोलिओ लसीकरणाच्या दिवशी लसीकरण केंद्रांवर अखंड वीजपुरवठा राहण्यासाठी ऊर्जा विभागाने आवश्यक ती खबरदारी घ्यावी, अशी सूचना डॉ. व्यास यांनी यावेळी केली. अंगणवाडी सेविका, आशा वर्कर आणि आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनी समन्वयातून ही मोहीम यशस्वी करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.

Web Title: Polio vaccine aims to provide polio vaccine to 1.25 million children in the state - Health Minister

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.