पोलीस हवालदाराकडून पोलीस महिलेचा विनयभंग

By लोकमत न्यूज नेटवर्क on Fri, March 09, 2018 7:14am

रोडरोमियोप्रमाणे पाठलाग करीत भररस्त्यात हात पकडून पोलीस हवालादाराने महिला पोलीस शिपायाचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना मलबार हिल येथे उघडकीस आली आहे. याप्रकरणी पोलीस हवालदार अफसल मुलानीविरुद्ध पोलिसांनी विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे.

मुंबई - रोडरोमियोप्रमाणे पाठलाग करीत भररस्त्यात हात पकडून पोलीस हवालादाराने महिला पोलीस शिपायाचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना मलबार हिल येथे उघडकीस आली आहे. याप्रकरणी पोलीस हवालदार अफसल मुलानीविरुद्ध पोलिसांनी विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. तक्रारदार महिला पोलीस मुंबई पोलीस दलात कार्यरत आहे. तिने केलेल्या तक्रारीनुसार, गेल्या वर्षी फेब्रुवारी महिन्यात ती त्वचा विकारासंबंधी डॉक्टरच्या शोधात होती. त्याच दरम्यान तिच्या सहकाºयाने मुलानीसोबत तिची ओळख करुन दिली. मुलानीच्या ओळखीने तिने एका डॉक्टरकडे उपचार सुरू केले. त्यानंतर मुलानी तिच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत होता. सुरुवातीला तिने त्याकडे दुर्लक्ष केले. त्यानंतर त्याने तिला चहासाठी आॅफर केली. त्यानंतर एकदा शर्ट खरेदी करण्यासाठी सोबत येण्याची विनंती केली. त्यानंतर त्याचे फोन सुरु झाले. तो रोज मेसेज करु लागला. तिने याबाबत त्याला सुनावूनही तो गप्प राहात नव्हता. अशातच नोव्हेंबरमध्ये त्याने भररस्त्यात तिचा हात पकडला आणि ^^‘आय लव्ह यू’ म्हटले. त्याला नकार देत ती तेथून निघून गेली. महिन्याभराने त्याने तिची माफी मागितली आणि पुन्हा असे करणार नसल्याचे सांगितले. त्यानंतर त्याचे शुभसकाळचे संदेश येणे सुरू झाले. याच दरम्यान त्याने तिला कॉल करुन एका बीट चौकीच्या रुममध्ये बोलावले. त्यामुळे तिने त्याच्याशी बोलणे बंद केले. मुलानीच्या संदेशांकडेही दुर्लक्ष केले. याच रागात तो आणखी त्रास देऊ लागला. तसेच पोलीस दलात बदनामी करण्याची धमकीही देऊ लागल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

संबंधित

नवी मुंबईचे पोलीस आयुक्त नगराळे यांना निलंबित करा
अपर पोलीस महासंचालकांनी केले गडचिरोली कारागृहाचे निरीक्षण
पोलिसाच्या मुलाची संगत असूनही ‘तो’ बालपणीच बनला सराईत गुन्हेगार
बीडमध्ये ४१ लाखांचा गांजा नष्ट
तीन चिमुकलींवर बलात्कार करणारा वृद्ध जेरबंद

मुंबई कडून आणखी

कापडी पिशव्यांसाठी महापालिकेस ५ कोटी रुपये
माजी तंत्रशिक्षण संचालक अ‍ॅट्रॉसिटी प्रकरणातून मुक्त; कनिष्ठ कर्मचाऱ्याने केली होती तक्रार
‘अर्धवटरावां’चा परदेशातही डंका, बोलक्या बाहुल्यांचे जगभरात खेळ
एक लाख पक्षी छायाचित्रे संग्रही असलेला अवलिया!
सांगा प्रवास करायचा तरी कसा? प्रवाशांचा सवाल; रेल रोकोने त्रस्त, ओला-उबेर चालकही संपात व्यस्त

आणखी वाचा