‘कोणा’च्या खुर्चीत बसलेला प्लंबर?, संबंधित अधिका-यावर होणार कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 8, 2018 02:09 AM2018-02-08T02:09:37+5:302018-02-08T02:09:47+5:30

पालिकेच्या पी दक्षिणमध्ये जलविभागातील कार्यालयात प्लंबर आणि त्याचा सहकारी कोणाच्या खुर्चीत बसले आहेत, याची चौकशी जलविभागाचे वरिष्ठ अधिकारी करत आहेत.

The plumber sitting in the chair of someone ?, the action will be taken on the concerned officer | ‘कोणा’च्या खुर्चीत बसलेला प्लंबर?, संबंधित अधिका-यावर होणार कारवाई

‘कोणा’च्या खुर्चीत बसलेला प्लंबर?, संबंधित अधिका-यावर होणार कारवाई

Next

- गौरी टेंबकर-कलगुटकर 
मुंबई : पालिकेच्या पी दक्षिणमध्ये जलविभागातील कार्यालयात प्लंबर आणि त्याचा सहकारी कोणाच्या खुर्चीत बसले आहेत, याची चौकशी जलविभागाचे वरिष्ठ अधिकारी करत आहेत. त्यानुसार, ज्याची ती खुर्ची असेल, त्याच्यावर चौकशीअंती कारवाई केली जाणार असल्याची माहिती मुख्य जलअभियंत्यांनी बुधवारी दिली.
‘प्लंबर चालवितो पालिकेचा कारभार’ या मथळ्याखाली १० जानेवारी रोजी ‘लोकमत’ने या संदर्भातील वृत्त प्रकाशित केले होते. यात पी दक्षिण विभागात असलेल्या जलविभागामध्ये एक प्लंबर अगदी बिनधास्तपणे पालिका अधिकाºयाच्या खुर्चीत बसून, संगणक हाताळत असल्याचा पदार्फाश एका ‘व्हिडीओ क्लिप’द्वारे करण्यात आला होता. पालिकेची गोपनीय माहिती असलेला संगणक प्लंबर हाताळत होता. तो एकटा नव्हता, तर त्याच्यासोबत त्याचा सहकारीदेखील होता.
हे वृत्त प्रकाशित झाल्यानंतर यातील तथ्य पडताळून पाहण्याचे निर्देश महानगरपालिकेचे मुख्य जलअभियंते ए. तवाडीया यांनी पश्चिम विभागाचे उपअभियंते राठोड यांना दिले होते. त्यानुसार, ३० जानेवारी रोजी हा अहवाल राठोड यांनी तवाडीया यांना पाठविल्याचे त्यांनी सांगितले. आता ज्या अधिकाºयाच्या खुर्चीत प्लंबर आणि त्याचा सहकारी बसला होता, त्या अधिकाºयावर कारवाई होणार असल्याचे समजते. त्यामुळेच कोणत्या अधिकाºयावर आणि काय कारवाई होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
>प्लंबरवर गुन्हा दाखल होणार का?
प्लंबर आणि त्याचा सहकारी ज्या अभियंत्याच्या खुर्चीवर बसले होते, तो अभियंता त्या ठिकाणी हजर नव्हता. त्यामुळे त्यांच्या गैरहजेरीत प्लंबरने त्यांच्या खुर्चीत बसून संगणक हाताळला असावा, अशी शक्यता वर्तविली जात आहे. त्यामुळे जर अभियंत्यांच्या गैरहजेरीत पालिकेची ‘गोपनीय’ माहिती असलेला संगणक त्या प्लंबरने हाताळला असेल, तर त्या प्लंबरच्या विरोधात पालिका गुन्हा दाखल करणार का, असाही प्रश्न उपस्थित होत आहे.
>उत्तर देणे गरजेचे
'लोकमत' च्या हाती आलेली व्हिडीओ क्लिप नीट पडताळून पाहिली, तर प्लंबर एका बाजूला संगणक हाताळत आहे, तर त्याच्या अगदी मागच्याच टेबलवर तिघे निवांतपणे जेवत आहेत. ते तिघे पालिका अधिकारी नव्हते का? जर ते पालिकेचे अधिकारी आहेत, तर त्यांनी प्लंबरला पालिकेचा संगणक हाताळताना रोखले का नाही? त्याला ही मुभा देण्याचे नेमके कारण काय? या प्रश्नाचेही उत्तर पी दक्षिण विभागाच्या जलविभागाने देणे गरजेचे आहे.
>त्यानंतरच कारवाई
मुळात पालिकेचा संगणक बाहेरच्या व्यक्तीने हाताळणे चुकीचेच आहे. प्लंबरने जेथे हे कृत्य केले ती खुर्ची कोणत्या कनिष्ठ अभियंत्याची आहे, याचा शोध आम्ही घेत आहोत. राठोड यांनी मला पाठविलेला अहवाल मी डीएमसीकडे दिला आहे. त्यांच्याकडून आलेल्या अहवालानंतर आम्ही संबंधितांवर काय कारवाई करायची, ते ठरवणार आहोत.
- ए. तवाडीया ( मुख्य जलअभियंता, मुंबई महानगर पालिका )

Web Title: The plumber sitting in the chair of someone ?, the action will be taken on the concerned officer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.