प्लॅस्टिकबंदी : १९ लाख ३० हजारांचा दंड वसूल

By ऑनलाइन लोकमत | Published: November 19, 2018 12:28 AM2018-11-19T00:28:44+5:302018-11-19T00:28:58+5:30

प्लॅस्टिकबंदी कितपत यशस्वी झाली? हा प्रश्न अनुत्तरितच असला, तरी महापालिका प्रशासनाची या प्रकरणात कारवाई सुरूच आहे. या कारवाईअंतर्गत सप्टेंबर, २०१८ पर्यंत ६० हजार ५१९ फेरीवाल्यांची प्रतिबंधित प्लॅस्टिक पडताळणी करण्यात आली.

Plastics: Recovery of fine of 19 lakh 30 thousand | प्लॅस्टिकबंदी : १९ लाख ३० हजारांचा दंड वसूल

प्लॅस्टिकबंदी : १९ लाख ३० हजारांचा दंड वसूल

मुंबई : प्लॅस्टिकबंदी कितपत यशस्वी झाली? हा प्रश्न अनुत्तरितच असला, तरी महापालिका प्रशासनाची या प्रकरणात कारवाई सुरूच आहे. या कारवाईअंतर्गत सप्टेंबर, २०१८ पर्यंत ६० हजार ५१९ फेरीवाल्यांची प्रतिबंधित प्लॅस्टिक पडताळणी करण्यात आली. पडताळणीमध्ये प्रतिबंधित प्लॅस्टिक आढळलेल्या ८४१ फेरीवाल्यांकडून ४५१४.८३३ किलोग्रॅम प्लॅस्टिक जप्त करण्यात आले, तसेच ३८६ प्रकरणांमधून १९ लाख ३० हजार रुपयांचा दंड महापालिकेकडून वसूल करण्यात आला.
फेरीवाल्यांवर पदपथ/रस्त्यांवरील दुकानांच्या आणि सदनिकांच्या वहिवाटीचा प्रवेश मार्ग अडवून, व्यवसाय करणाऱ्या फेरीवाल्यांवर निष्कासनाची कारवाई नियमितपणे पार पाडण्यात येते. एप्रिल, २०१८ ते जून, २०१८ पर्यंत ८ चायनिज हातगाड्या, २९१ खाद्यपदार्थ हातगाड्या व ७८७ इतर हातगाड्यांसह एकूण १,०८६ अनधिकृत चारचाकी हातगाड्यांवर कारवाई करण्यात आली, तसेच ४६ शुगर केन क्रशर, २०१७० खाद्यपदार्थ विक्रेते व इतर फेरीवाले मिळून ५८,१९९ अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई करण्यात आली आहे. जे अनधिकृत फेरीवाले किंवा खाद्यपदार्थ पथविक्रेते सिलिंडरचा वापर करतात, अशा फेरीवाल्यांवर सिलिंडर जप्त करून कारवाई केली जाते. सदर कारवाईदरम्यान एप्रिल, २०१८ ते जून, २०१८पर्यंत १,१४१ सिलिंडर जप्त करण्यात आले, अशी माहिती महापालिकेने दिली.
दरम्यान, १ नोव्हेंबर रोजी दिलेल्या आदेशानुसार, सर्व वरिष्ठ निरीक्षक यांना रेल्वे स्थानकापासून १५० मीटर अंतरापर्यंतचा क्षेत्र फेरीवाला मुक्त ठेवावा, असे निर्देश दिलेले आहेत. त्यानुसार, सदर परिसर ना-फेरीवाला क्षेत्र घोषित करण्यात आला असून, रेल्वे स्थानकापासून १५० मीटर अंतरावर तसे सीमांकन करण्यात आले आहे. त्या अनुषंगाने सदर परिसर रेल्वे पोलीस दलाच्या साहाय्याने फेरीवाला मुक्त ठेवण्यात येत आहे, अशी माहिती महापालिकेने दिली.

Web Title: Plastics: Recovery of fine of 19 lakh 30 thousand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.