प्लॅस्टिकऐवजी आता लाकडी ताट! दक्षिण भारतातील वस्तू मुंबईत दाखल, लोकांच्या पसंतीबाबत व्यापाऱ्यांना शंका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2018 03:13 AM2018-04-21T03:13:45+5:302018-04-21T03:13:45+5:30

घरगुती, सार्वजनिक कार्यक्रमात, लग्नसोहळ्यात किंवा कुठल्याही मंगलकार्यात जेथे जेवण असते तेथे हमखास वापरली जाणारी वस्तू म्हणजे प्लॅस्टिकचे ताट आणि ग्लास. परंतु, प्लॅस्टिक बंदीमुळे या वस्तू हद्दपार होणार आहेत.

 Plastics now instead of plastic! South Indian entities enter into Mumbai, traders question the public's preferences | प्लॅस्टिकऐवजी आता लाकडी ताट! दक्षिण भारतातील वस्तू मुंबईत दाखल, लोकांच्या पसंतीबाबत व्यापाऱ्यांना शंका

प्लॅस्टिकऐवजी आता लाकडी ताट! दक्षिण भारतातील वस्तू मुंबईत दाखल, लोकांच्या पसंतीबाबत व्यापाऱ्यांना शंका

Next

मुंबई : घरगुती, सार्वजनिक कार्यक्रमात, लग्नसोहळ्यात किंवा कुठल्याही मंगलकार्यात जेथे जेवण असते तेथे हमखास वापरली जाणारी वस्तू म्हणजे प्लॅस्टिकचे ताट आणि ग्लास. परंतु, प्लॅस्टिक बंदीमुळे या वस्तू हद्दपार होणार आहेत. हीच संधी साधत दक्षिण भारतातील व्यापारी मुंबईतील घाऊक बाजारपेठेत तसेच नवी मुंबईतील एपीएमसी मार्केटमध्ये लाकडी ताट, वाट्या, चमचे विक्रीसाठी घेऊन आले आहेत. मात्र, या वस्तूंची किंमत प्लॅस्टिकपेक्षा सातपट अधिक आहे. त्यामुळे या लाकडी वस्तूंना भविष्यात लोकांची कितपत पसंती मिळेल, याबाबत मात्र व्यापाºयांच्या मनात शंका आहे.
प्लॅस्टिकबंदी लागू झाल्यापासून मुंबईतील आणि एपीएमसीतील प्लॅस्टिकच्या वस्तूंची अनेक दुकाने बंदच ठेवण्यात आली आहेत. हीच संधी साधत दक्षिण भारतातील व्यापाºयांनी आपला मोर्चा मुंबईत वळवला आहे. तेथील लाकडी ताट, वाट्या, चमचे व्यापºयांनी मुंबई, नवी मुंबईतील बाजारपेठेत विक्रीसाठी उपलब्ध करून दिले आहेत. सुपारीच्या लाकडापासून तयार केलेली ताटे ८० रुपयांना १० तर मक्याच्या झाडांपासून बनविलेली ताटे ७२ रुपयांना १० अशा दराने विकण्यात येत आहेत. त्यावर १८ टक्के वस्तू व सेवा करही मोजावा लागत आहे. तर, लाकडी चमचे प्रतिनग ३ रुपयांना उपलब्ध आहेत.
मात्र आतापर्यंत सुमारे १ रुपयाला एक अशा दरात प्लॅस्टिकची ताट खरेदी करणाºया ग्राहकांना हे सुमारे ७ ते ८ रुपयांना एक अशा दरात उपलब्ध असलेले लाकडी ताट परवडणे कठीणच आहे. लाकडी ताटांची मागणी जरी वाढली असली तरी ती मागणी घाऊक व्यापाºयांकडून जास्त प्रमाणात होत आहे. थर्माकोल आणि प्लॅस्टिकवर बंदी आल्याने खरी अडचण कॅटरर्सची झाली आहे. लग्नसमारंभात लाकडी ताटली, वाट्या, चमचे यांचा वापर जेवणासाठी करण्यात येत आहे. या लाकडी वस्तूंची किंमत जास्त असल्याने पर्यायाने कॅटरर्स आपल्या प्लेट दरांमध्येही वाढ करीत आहेत. त्यामुळे सामान्यांना याचा फटका बसणार आहे. कॅटरर्स लग्नसमारंभात जेवणाच्या एका ताटाचा सरासरी २०० रुपयांपर्यंत दर आकारतात. आता लाकडी ताटे आल्यानंतर हाच दर २५० ते ३०० रुपयांच्या घरात जाऊन पोहोचला आहे. यामुळे लग्नसमारंभातील या वाढलेल्या खर्चामुळे आधीच उकाड्याने घाम फुटलेल्या मुंबईकरांना डबल घाम फुटण्याची वेळ आली आहे. स्टीलच्या ताटल्या, वाट्या आणि चमचे हासुद्धा प्लॅस्टिकला एक पर्याय असला तरी सध्या घाऊक व्यापारी आणि कॅटरर्स स्टील वस्तूंपेक्षा स्वस्त अशा लाकडी वस्तूंनाच प्राधान्य देत आहेत.

सरकारने प्लॅस्टिक बंदीचा घेतलेला निर्णय हा योग्यच आहे. पण त्याचा फटका आमच्यासारख्या सामान्यांना पडणार आहे. लग्नसमारंभामध्ये सामान्य मध्यमवर्गीयांचं बजेट हे काटेकोर असते. या लाकडी वस्तूंच्या सातपट जास्त किमतींमुळे आमचे बजेट गगनाला भिडणार आहे. कॅटरर्सच्या भाववाढीमुळे त्यांना योग्य तो मोबदला मिळेल; पण सामान्यांची मात्र यात परवड होणार आहे.
- स्नेहल भिडे, गृहिणी

राज्य सरकारने प्लॅस्टिक आणि थर्माकोलच्या वापरावर बंदी आणल्याने आता पर्याय म्हणून दक्षिण भारतातील लाकडी वस्तू मुंबईच्या बाजारात उपलब्ध झाल्या आहेत. आधीदेखील या वस्तूंचे उत्पादन केले जात होते. मात्र आता प्लॅस्टिक बंदीमुळे मागणी वाढेल, अशी अपेक्षा आहे.
- जयराज पटेल, घाऊक विक्रेते, एपीएमसी मार्केट

Web Title:  Plastics now instead of plastic! South Indian entities enter into Mumbai, traders question the public's preferences

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Mumbaiमुंबई